CPL 2020 : सलामीच्या सामन्यात कोण भारी ठरणार?

सुशांत जाधव
Tuesday, 18 August 2020

 कॅरेबियन लीगमध्ये सहा संघ सहभागी असून यात आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूही भाग घेणार आहेत. आयपीएलपूर्वी त्यांच्यासाठी ही स्पर्धा एक रंगीत तालीमच असेल.

कोरोनाजन्य परिस्थितीमुळे ब्रेक लागलेल्या क्रिकेट जगतातील लीग सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगच्या ((caribbean premier league 2020) ) माध्यमातून क्रिकेटच्या मैदानातील थरराक क्षण क्रिकेट चाहत्यांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहेत. या स्पर्धेतील अंतिम सामना हा 10 सप्टेंबरला सुरुवात होणार असून त्यानंतर नऊ दिवसांनी आयपीएलचा थरार रंगणार आहे.   कॅरेबियन लीगमध्ये सहा संघ सहभागी असून यात आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूही भाग घेणार आहेत. आयपीएलपूर्वी त्यांच्यासाठी ही स्पर्धा एक रंगीत तालीमच असेल. 24 दिवसांत या स्पर्धेत 33 सामने खेळवण्यात येणार आहेत.  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्पर्धेतील सर्व सामने त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या ब्रायन लारा क्रिकेट अकादमी आणि क्वींस पार्क ओवल या दोनच मैदानात खेळवण्यात येणार आहेत.

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये धावांची 'बरसात' करणारे आघाडीचे 5 फलंदाज!

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये तीन वेळा चॅम्पियन ठरलेली  त्रिनिबागो नाइट राउडर्स (Trinbago Knight Riders) आणि 5 वेळा  अंतिम सामन्यापर्यंत मजल मारलेल्या गुयाना अमेझॉन वॉरियर्स (Guyana Amazon Warriors) यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धेच्या सलामीच्या दिवशी दोन सामने खेळवण्यात येणार आहेत. दुसरा सामना  बारबाडोस ट्रायडेंटस आणि सेंट किटस नेविस पॅट्रियटस यांच्यात रंगणार आहे.

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या गड्याचा बोलबाला

त्रिनिबागो नाइट रायडर्स संघ (Trinbago Knight Riders) 

सुनील नरेन, लिंडल सिमन्स, कॉलिन मुन्रो, टीम सेफर्ट (यष्टीरक्षक), केरेन पोलार्ड (कर्णधार),  
Trinbago Knight Riders Squad: Sunil Narine, Lendl Simmons, Colin Munro, Tim Seifert(w), Kieron Pollard(c), टिओन वेबस्टर, ड्वेन ब्रावो, फवाद अहमद, अली खान, जेडन सील, सिकंदर रझा, अँड्रेसन फिलिप, डेरेन ब्रावो, प्रविण तांबे, अमीर जगू Jangoo,खरी पियरे, अकेल होसीन

अमेझॉन वॉरियर्स (Guyana Amazon Warriors) 

बँडॉन किंग, चंद्रपॉल हेमराज, शिमरॉन हेटमायर, रॉस टेलर, निकोलस पूरन(यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, कीमो पॉल, ख्रिस ग्रीन(कर्णधार), ओडियन स्मिथ, इम्रान ताहिर, नवीन उल-हक,अँथनी ब्रॅम्बल, अशमेड नेड, जसदिप सिंग, केविन सिन्क्लेअर,किसुंदनाथ मग्राम.


​ ​

संबंधित बातम्या