ब्रॅडमन, पाँटिंगपेक्षाही विराट ठरला सरस

वृत्तसंस्था
Thursday, 23 August 2018

भारताचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी सामन्यामध्ये दोन्ही डावांत मिळून 200 पेक्षा अधिक धावा सर्वाधिक म्हणजे 7 वेळा केल्या आहेत. त्याने अशी कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांना मागे टाकले आहे.

नॉटिंगहम : भारताचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी सामन्यामध्ये दोन्ही डावांत मिळून 200 पेक्षा अधिक धावा सर्वाधिक म्हणजे 7 वेळा केल्या आहेत. त्याने अशी कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे या सातही वेळी भारताने सामन्यात विजय मिळवला आहे. 

भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी अशा कमगिरी फक्त माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केलेली आहे. त्याने 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 224 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताने आठ विकेटने विजय मिळवला होता. विराट कोहलीने कसोटी सामन्यामध्ये 200पेक्षा जास्त धावा करण्याची ही दहावी वेळ आहे. हा सुद्धा त्याच्या नावावरील एक विक्रमच आहे.

डॉन ब्रॅडमन यांनी चार वेळा इंग्लंडविरुद्ध आणि दोन वेळा भारताविरुद्ध ही कामगिरी केली आहे तर पॉंटिंगने प्रत्येकी दोन वेळा पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि प्रत्येकी एकदा इंग्लंड आणि वेस्ट इंडिज विरुद्ध अशी कामगिरी केली आहे.

संबंधित बातम्या