'कोरोना'मुळे "बीडब्ल्यूएफ'ने जुलैपर्यंतच्या बॅडमिंटनच्या स्पर्धा केल्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

कोरोना विषाणूने देशावर चांगलाच प्रभाव पाडला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच असल्याने काय करावे आणि काय नाही, असाच प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात उपस्थित होत आहे. क्रिकेटमधील प्रसिद्ध इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा याच कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा भारत दौराही याच कारणामुळे रद्द केला होता. आता यात आणखी एक खेळाची भर पडली आहे. "बीडब्ल्यूएफ'ने मे, जून व जुलै महिन्यात होणाऱ्या बॅडमिंटनच्या सर्व स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चाहत्यांची पार निराशा झाली आहे. 

सुशील म्हणतो, चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये होणार सहभागी 

देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतात ही वाढ अन्य देशांच्या तुलनेत कमी असली तरी खबरदारीच्या उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. याच कारणाने देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धा अखेर रद्द

कोरोनापासून सावरण्यास जगाला किती वेळ लागेल हे सध्या सांगणे कठीण असल्याने जागतिक बॅडमिंटन महासंघाने "बीडब्ल्यूएफ' सोमवारी बॅडमिंटनच्या मे, जून व जुलै या महिन्यांमध्ये होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय, कनिष्ठ आणि अपंगांच्या स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बॅडमिंटनच्या चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळापासून आणखी काही दिवस दूर राहावे लागणार आहे. 

"बीडब्ल्यूएफ'ने जागतिक टूरसह दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या स्पर्धादेखील रद्द केल्या आहेत. जुलैपर्यंत स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय "बीडब्ल्यूएफ'ने यजमान सदस्य देशांच्या संघटनांशी चर्चा करूनच घेतला आहे. या कालावधीत प्रतिष्ठित इंडोनेशिया खुली स्पर्धाही रद्द केली जाणार आहे. टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आल्यानंतर आता पात्रता स्पर्धाचे कसे नियोजन करायचे, याचादेखील आढावा घेण्यात येणार असल्याचे "बीडब्ल्यूएफ'कडून सांगण्यात आले. 

चहल ढिंच्यॅक पूजा शोभेल तुला; चाहत्यांचे भलतेच टोमणे

खेळाडूंची प्रकृती सांभाळणे सर्वोच्च प्राधान्य 
कोरोनाचा संसर्ग जगभरात वाढत चालला आहे. या स्थितीत जुलैपर्यंतच्या बॅडमिंटनच्या सर्व स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खेळाडूंची प्रकृती सांभाळणे सर्वोच्च प्राधान्य आहे. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीवरील स्थगिती कधी उठवायची, याचा निर्णयही स्पर्धांना सुरुवात झाल्यावर घेऊ, असे बीडब्ल्यूएफने स्पष्ट केले.
 


​ ​

संबंधित बातम्या