पी. व्ही. सिंधूला मिळाला मान 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

दरवर्षी एका खेळाडूची निवड केली जाते. यंदा हा मान भारताला पी. व्ही. सिंधूच्या रूपात मिळाला आहे.

कोरोनामुळे देशात हाहाकार माजला आहे. सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. लॉकडाउनमुळे तर नागरिकांना घराबाहेर निघनेही कठीण झाले आहे. दुसरीकडे खेळांवरही परिणाम झाल्याने वेळ घालवण्यासाठी नागरिकांजवळ साधन नाही. यामुळे सर्वाच्या मनात निराशा निर्माण झाली आहे. अशात पी. व्ही. सिंधूच्या रूपात भारतासाठी गोड आली आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) "मी बॅडमिंटन' मोहिमेची जागतिक सदिच्छादूत म्हणून सिंधूची निवड करण्यात आली आहे. 

अखंडता आणि प्रामाणिकपणा यांना अनुसरून जागतिक बॅडमिंटन महासंघाकडून पाच वर्षांपासून खेळाडूंना धडे दिले जात आहेत. चांगला खेळाडू निर्माण व्हावा हा यामागील उद्देश आहे. याअंतर्गत दरवर्षी एका खेळाडूची निवड केली जाते. यंदा हा मान भारताला पी. व्ही. सिंधूच्या रूपात मिळाला आहे. बॅडमिंटन या खेळाविषयी असणारे प्रेम आणि आदर खेळाडूला या मोहिमेद्वारे व्यक्त करावा, असा उद्देश आहे. 

भारत-ऑस्ट्रेलिया मालिका ऍडलेड ओव्हल मध्ये खेळवा : हेझलवूड

जागतिक सदिच्छादूत म्हणून मला या खेळाविषयी असलेले प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. माझ्याप्रमाणेच अन्य खेळाडू देखील या खेळाविषयीच्या त्यांच्या भावना व्यक्त करतील. आपल्या खेळाविषयी समाधान वाटले पाहिजे. आपला खेळ हा स्वच्छ आणि पारदर्शक प्रतिमेचा असला पाहिजे, असे मत भारताची अव्वल खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्ते केले.


​ ​

संबंधित बातम्या