‘डब्ल्यूएफ’ कडून नवे वेळापत्रक जाहीर, इंडीयन ओपन डिसेंबर महिन्यात होणार 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

विश्व बॅडमिंटन महासंघ(बीडब्लूएफ)ने स्पर्धेच्या आयोजनासाठी नव्या तरखांची घोषणा केली आहे.  

कोरोना व्हायरसमुळे सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगीत करण्यात आल्या आहेत, जगभरात खेळांना पुन्हा सुरु करण्यासाठी जगभर प्रयत्न केले जात आहेत.  कोरोना व्हायरम माहामारीमुळे ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन आठ ते 13 डिसेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. विश्व बॅडमिंटन महासंघ(बीडब्लूएफ)ने स्पर्धेच्या आयोजनासाठी नव्या तरखांची घोषणा केली आहे.  बीडब्ल्यूएफने प्रसिध्द केलेल्या वक्तल्यात वर्ल्ड सुपर 500 स्पर्धा 24 ते 29 मार्च दरम्यान दिल्लीत आयोजीत करण्यात येणार होती. पण आता त्या स्पर्धा 13 डिसेंबर रोजी होणार आहेत. तसेच 11 ते 16 ऑगस्ट दरम्यान हैद्राबाद ओपन तर 17 ते 22 नोहेंबर या काळात सैयद मोदी अंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यात येणार आहेत.

आठ वेगवेगळ्या स्पर्धांच्या पुर्वीच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत, यामध्ये न्यूझीलंड ओपन सुपर 300, इंडोनेशिया ओपन 1000, मलेशिया ओपन सुपर 750, थायलंड ओपन सुपर 500 आणि चीन मध्ये होणारी वर्ल्ड टूर फायनल्स या स्पर्धांचा समावेश आहे.“बॅडमिंटन स्पर्धा पुन्हा सुरु करणे कठीण काम आहे, कमी कालावधीमध्ये खूप जास्त स्पर्धा आयोजीत केल्या जाणार आहेत. व्यस्त वेळापत्रक असताना पण त्यासाठी अंतराष्ट्रीय प्रवासावर असणारे निर्बंध हटवण्यात येणे गरजेचे आहे.”अशी माहिती बीडब्ल्यूएफ  चे सचिव थॉमस लुंड यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
 


​ ​

संबंधित बातम्या