तरीही भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वलच : ब्रायन लारा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 March 2020

न्यूझीलंडने वन-डे आणि कसोटी मालिकेत भारताला नामोहरम करत टी-२० मालिकेत पराभवाचा वचपा काढला. न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज टिकाव धरु शकले नाहीत.

न्यूझीलंडने वन-डे आणि कसोटी मालिकेत भारताला नामोहरम करत टी-२० मालिकेत पराभवाचा वचपा काढला. न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज टिकाव धरु शकले नाहीत. या पराभवामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला नवीन वर्षात पहिल्या परदेश दौऱ्यात पराभवाचा सामना करावा लागला. 

INDvsSA : कोरोनाची दहशतीमुळे IPL नंतर भारत-दक्षिण आफ्रिका मालिकाही रद्द!

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने भारतीय संघाच्या या कामगिरीबद्दल आपलं म्हणाला की “गेल्या काही वर्षांत भारतीय संघ सतत प्रवास करतो आहे. माझ्यामते न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिकेतला पराभव हा याच सतत क्रिकेट खेळण्याने झाला आहे. वन-डे आणि टी-२० मालिका खेळल्यानंतर न्यूझीलंडच्या वातावरणात कसोटी खेळणं भारताला अवघड गेलं असावं. पण माझ्या मते अजुनही भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आहे.” असं लारा ESPNCricinfo संकेतस्थळाशी बोलत होता.

क्रिकेट वर्ल्ड कपचं टाईमटेबल आलं! न्यूझीलंडमध्ये रंगणार स्पर्धा

भारताच्या चिव्हारी लागणाऱ्या या पराभवानंतरही कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या काळात भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमधली कामगिरी कशी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या