देशातील क्रिकेटला नव्या वर्षापर्यंत ब्रेक?

संजय घारपुरे
Saturday, 18 July 2020

देशांतर्गत क्रिकेट मोसमास नव्या वर्षातच सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे भारतीय क्रिकेट मंडळाने सूचीत केले.

मुंबई : देशांतर्गत क्रिकेट मोसमास नव्या वर्षातच सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे भारतीय क्रिकेट मंडळाने सूचीत केले. देशांतर्गत स्पर्धांत प्रवास महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे कोणतीही स्पर्धा डिसेंबरअखेरपर्यंत सुरु करण्याचा विचार नसल्याचे भारतीय क्रिकेट मंडळाने कार्यकारी परिषदेस सांगितले असल्याचे समजते.

भारतीय क्रिकेटरच्या 'किस' ची ही स्टोरी तुम्ही 'मिस'तर नाही ना केली  

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत एकंदर 38 संघांचा सहभाग असतो. या स्पर्धा घेताना  सध्याच्या परिस्थितीत प्रवासाचा मुद्दा महत्त्वाचा असेल. त्यामुळे कोणताही निर्णय घाईघाईत घेण्याची भारतीय मंडळाची तयारी नाही. आता देशांतर्गत मोसम जवळपास चार महिने उशिरा सुरुवात होणार असल्याने काही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. 

भज्जीच म्हणतो, मी खेल रत्नला अपात्र

भारतीय मंडळाने सध्या तरी दुलीप आणि देवधर करंडक या विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धांबरोबरच वरिष्ठ गटातील चॅलेंजर स्पर्धाही रद्द करण्याचे ठरवले असल्याचे संकेत मिळत आहेत. कुमार तसेच युवा गटातील काही स्पर्धा रद्द होणार हे निश्चितच आहे. केवळ देशांतर्गत क्रिकेट स्पर्धाच नव्हे तर भारतात या वर्षाअखेरपर्यंत कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका होण्याचीही शक्यता नाही.

भारतीय संघाचे सराव शिबिर अहमदाबादला?
भारतीय क्रिकेट संघाचे सराव शिबिर अहमदाबादला होण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मोटेरा येथे तयार झाले आहे. याच ठिकाणी हे शिबिर होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय सामन्याद्वारे याचे थाटात उदघाटन करण्याचा विचार होता, पण कोरोनामुळे तो लांबणीवर पडला आहे. मात्र शिबिरासाठी हे योग्य ठिकाण आहे. स्टेडियमच्या संकुल परिसरातच चांगली निवास व्यवस्था आहे. आवश्यकता भासल्यास तिथे विलगीकरणही होऊ शकेल. भारतीय क्रिकेटपटू दिर्घकाळ सरावापासून दूर आहेत, त्यामुळे ही जागा दिर्घकालीन सरावासाठी योग्य ठरु शकेल, असे मंडळाचे मत आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या