किंग खानचा संघ सिक्सर्स किंगमुळे विजयी

वृत्तसंस्था
Sunday, 2 September 2018

वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ड्वेन ब्राव्होने कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये एकाच षटकात सलग पाच टोलेजंग षटकार खेचले. 

त्रिनिनाद : वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ड्वेन ब्राव्होने कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये एकाच षटकात सलग पाच टोलेजंग षटकार खेचले. 

सेंट किट्स अॅंड पॅटरॉईट्स आणि त्रिनबागो नाईट राईडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात ब्राव्होने सिक्सर्स किंग या बिरुदाला साजेशी करत त्रिनबागो नाईट राईडर्सला विजय मिळवून दिला.

19 षटकांत सेंट किट्स अॅंड पॅटरॉईट्स संघाकडून वेस्ट इंडिजचाच गोलंदाज अल्झरी जोसेफ गोलंदाजी करत होता. या षटकात ब्राव्होने जोसेफला सलग पाच षटकार खेचले. त्यामुळेच त्रिनबागो संघाने सेंट किट्ससमोर 199 धावांचे आव्हान उभारले. ब्राव्हो 17व्या षटकातच मैदानावर आला होता आणि त्याने या षटकात फक्त एकच धाव केली होती. 18व्या षटकात त्याने आणखी दोन धावा केल्या. त्यानंतर 19व्या षटकात मात्र त्याने सलग पाच षटकार खेचले. त्याने 11 चेंडूंमध्ये केलेल्या 37 धावांमुळे 199चे आव्हान उभे केले गेले.    


​ ​

संबंधित बातम्या