मेरी कोमचा सुवर्णठोसा कायम 

वृत्तसंस्था
Sunday, 16 September 2018

मुंबई : मेरी कोमने या वर्षातील तिसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकताना पोलंडमधील सिलेसियन ओपन बॉक्‍सिंग स्पर्धेत 48 किलो गटात बाजी मारली. या स्पर्धेत भारताने सहा सुवर्ण, सहा रौप्यपदकांसह तेरा पदके जिंकली. 

पाच वेळा जगज्जेतेपद जिंकलेल्या मेरीला दुखापतीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेपासून दूर राहावे लागले होते. तिने कझाकिस्तानच्या ऐगेरीम कॅसानेयेवा हिला हरवून वरिष्ठ गटातील भारताचे एकमेव सुवर्णपदक जिंकले. मेरीचे या वर्षातील हे तिसरे सुवर्णपदक. तिने यापूर्वी इंडिया ओपन; तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तिने बल्गेरियातील रौप्यपदक पटकावले होते. 

ऑलिंपिक ब्रॉंझ जिंकलेल्या मेरीने तिच्याहून उंच असलेल्या प्रतिस्पर्धीस जोरदार प्रतिआक्रमण करीत जेरीस आणले. तिने क्वचितच प्रतिस्पर्धीस वर्चस्वाची संधी दिली आणि 5-0 असा सहज विजय मिळविला. "मेरीने लढतीची योजना चांगल्या प्रकारे अमलात आणली. तिने क्वचितच चूक केली असेल,' असे भारतीय मार्गदर्शक रॅफेल बेर्गामास्को यांनी सांगितले. 

मनीषा 54 किलो गटाच्या अंतिम लढतीत युक्रेनच्या इवाना कृपेनियाविरुद्ध 2-3 पराजित झाली. खरं तर मनीषाच्या बाजूने निकाल हवा होता, असे बेर्गामास्को यांनी सांगितले. ज्योती गुलियाने युवती गटातील 51 किलो गटाच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या वयोगटातील ती एकमेव सुवर्णपदक विजेती आहे. 

मुलींचा तुर्कीत सुवर्णधडाका 
भाग्यबाती काचारी (81 किलो), मोनिका (48) आणि सिमरनजीत कौर (64) यांनी तुर्कीतील अहमत कॉमरेट स्पर्धेत भारतास सुवर्णपदक जिंकून दिले. तिघींनीही यजमानांच्या स्पर्धकासच अंतिम फेरीत हरवले. भारताने या स्पर्धेत सात पदके जिंकली. सिमरनजीतने सेमा कॅलिस्कान हिला, मोनिकाने आयसे कॅगिरेर हिला; तर भाग्यबातीने सेल्मा कॅराकोयुन हिला हरवले. पिंकी जांगरा (51) तसेच सोनिया लाथेर (57 किलो) यांना अंतिम फेरीत हार पत्करावी लागली. 

​ ​

संबंधित बातम्या