सौरव गांगुली यांच्या 'कूलिंग ऑफ पीरियड'चा निर्णय वेटिंगवरच!

सुशांत जाधव
Wednesday, 22 July 2020

लोढा समितीच्या शिफारशीतील नियमावलीनुसार, ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सौरव गांगुली यांचा कार्यकाळ या महिन्यात पूर्ण होत आहे.

नवी दिल्ली : बीसीसीआयच्या घटना बदलासंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.  बीसीसीआयच्या घटना दुरुस्तीमध्ये  'कूलिंग ऑफ पीरियड' या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळे बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष आणि सचिव जय शाह आपल्या पदावर कायम राहू शकतील.  सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर बुधवारी याप्रकरणातील याचिकेवरील सुनावणी झाली. सौरव गांगुली आणि जय शाह आपल्या पदावर कायम राहणार की कूलिंग पीरियडमुळे त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार यासंदर्भात आजच निर्णय होईल, असे वाटत होते. मात्र अंतिम निर्णय आता आणखी काही दिवस पुढे ढकलला आहे.

वर्णभेदाचा_खेळ : आता खपवून घेणार नाही! जोफ्रा आर्चर भडकला |

लोढा समितीच्या शिफारशीतील नियमावलीनुसार, ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सौरव गांगुली यांचा कार्यकाळ या महिन्यात पूर्ण होत आहे. तर जय शहा यांचा कार्यकाळ मागील महिन्यातच संपुष्टात आला आहे. लोढा समितीने सुचविलेल्या शिफारसींनुसार कोणतीही व्यक्ती राज्य क्रिकेट संघ किंवा बीसीसीआयच्या पदावर सलग 6 वर्षांपेक्षा अधिककाळ पदाचा लाभ घेऊ शकत नाही. 6 वर्षांच्या कार्यकाळानंतर संबंधित व्यक्तीला 3 वर्षांचा कूलिंग ऑफ परियडला सामोरे जावे लागेल.

T20 वर्ल्डकपमुळे भारतात रंगणाऱ्या ODI वर्ल्डकपच्या वेळापत्रकात बदल

सौरव गांगुली यांनी 5 वर्षे 3 महिने बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी त्यांना केवळ 9 महिन्यांचा अवधी मिळालाय. बीसीसीआयने वार्षिक सभेमध्ये कूलिंग ऑफ पीरियडच्या नियमातील बदलाला मंजूरी दिली होती. राज्य क्रिकेट संघटना आणि बीसीसीआय दोन्हींचा कार्यकाळ विचारात न घेता केवळ बीसीसीआयमध्ये 6 वर्षांचा कालावधी झाल्यानंतरच कूलिंग ऑफ पीरियडमध्ये जावे लागेल, असा बदल केला होता. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरूण धूमल यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.    


​ ​

संबंधित बातम्या