Black And White Challenge: महिला खेळाडूंची बॉलिवूड तारकांना टक्कर देणारी अदाकारी!

सुशांत जाधव
Wednesday, 29 July 2020

मैदानातील स्पर्धा स्थगित असाना ही स्टार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत.  

सध्याच्या घडीला सोशल मीडियावर ब्लॅक अँण्ड व्हाइट चॅलेंजची चांगलीच चर्चा सुरु आहे. बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच या चॅलेंजमध्ये महिला खेळाडूही सहभागी झाल्याचे पाहायला मिळते. सानिया अन् पीव्ही सिंधूनंतर आता ज्वाला गुट्टासह क्रिकेटर स्मृती मानधना, सायना नेहवालनेही हे चॅलेंज स्वीकारल्याचं पाहायला मिळाले. बॅडमिंटनपटू  सायना नेहवाल यांनी राष्ट्रीय सराव शिबीर कोलमडल्यानंतर घरीच सरावाला पसंती दिली आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झा, ज्वाला गुट्टा यांच्यासह भारतीय संघातील सलामीची फलंदाजी स्मृती मानधना देखील लॉकडाउनच्या काळात आपला वेळ कुटुंबियांसोबत घालवत आहे. मैदानातील स्पर्धा स्थगित असाना ही स्टार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत.  

Image may contain: 1 person

#सायना_नेहवाल : भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हैदराबादमधील राष्ट्रीय सराव शिबिराच्या माध्यमातून कोर्टवर उतरणार होती. मात्र हे शिबिर लांबणीवर पडल्यामुळे तिच्या कोर्टवरील खेळाची प्रतिक्षा आणखी लांबणीवर पडली आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सायनाने ब्लॅक अँण्ड व्हाइट फोटो शेअर करत चॅलेंज स्वीकारल्याचे पाहायला मिळाले.   

Image may contain: 1 person, closeup

#स्मृती_मानधना : भारतीय संघाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना देखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय दिसते. मूळची महाराष्ट्रातील सांगलीची असलेली स्मृती महिला विश्वचषकानंतर आपल्या घरीच असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असल्याचे पाहायला मिळते. तिने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ब्लॅक अँण्ड व्हाइट फोटो शेअर करत हे अनोखे चॅलेंज स्वीकारल्याचे पाहायला मिळाले. 

Image may contain: 1 person, closeup

#सानिया_ मिर्झा: भारताची आघाडीची टेनिस स्टार सानिया मिर्झाने देखील आपल्या अधिकृत ट्विटर इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हे हटके चॅलेंज स्वीकारले. फोटो शेअर करताना तिने बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाला देखील मेन्शन केले आहे. यापूर्वी सानिया मिर्झाने घरामध्ये वर्कआउट करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेअर केले होते. 

Image may contain: 1 person, standing and outdoor

#ज्वाला गुट्टा : भारतीय टेनिस स्टार ज्लाला गुट्टा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. एकेकाळी टेनिस कोर्टवरील खेळाने चर्चित असलेली ज्वाला गुट्टा सध्या प्रियकर विष्णी विशालसोबत अनेक फोटो शेअर करताना दिसते. तिनेही साडीवरील हटके लूकवाला फोटो शेअर करत या चॅलेंजमध्ये सहभाग घेतलाय. 

Image may contain: 1 person, standing

#पीव्ही सिंधू : जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये भारताला पदक मिळवून देणारी पहिली महिला बॅडमिंटनपटूचा मान मिळवणाऱ्या सिंधूनेही सोशल मीडियावरील चॅलेंज स्वीकारत हटके लूकमध्ये फोटो शेअर केलाय. 


​ ​

संबंधित बातम्या