Happy Birthday Mithali Raj : महिला क्रिकेटला अच्छे दिन आणणारी साध्वी

वृत्तसंस्था
Tuesday, 3 December 2019

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज ही अशीच साध्वी आहे. महिलांच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी पुरुषांशी तुलना हीच फुटपट्टी लावली जाते. त्यानुसार मितालीला महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर अशी उपाधी देण्यात आली.

अध्यात्माच्या मार्गात भक्त ते साधक अशी वाटचाल होते. भक्त ईश्वराकडे स्वतःसाठी मागतो, तर साधक वैश्विक कल्याणासाठी निर्गुण उपासना करतो. कोणत्याही क्षेत्रातील सर्जनशील व्यक्तींचेही असेच असते. खेळाडू सुद्धा त्यास अपवाद नसतो. आधी खेळाडू वैयक्तिक आनंदापोटी खेळतात, मग ते संघासाठी-देशासाठी आणि पर्यायाने एकूणच खेळासाठी वेगळे परिमाण देण्याकरीता सराव अन् कामगिरीच्या माध्यमातून साधनेत सक्रीय राहतात.

मी थकलोय, कदाचित आता निवृत्ती घेईन

Image result for mithali raj

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज ही अशीच साध्वी आहे. महिलांच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी पुरुषांशी तुलना हीच फुटपट्टी लावली जाते. त्यानुसार मितालीला महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर अशी उपाधी देण्यात आली. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत वन-डेमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम प्रस्थापित करून तिने ही तुलना सार्थ ठरविली. मग न्यूझीलंडविरुद्ध निर्णायक सामन्यात तिने शतकी खेळी साकारली.

बाबांच्या मर्जीविरुद्ध क्रिकेट खेळला अन् आता टीम इंडियाचा कर्णधार झाला

मिताली नवनवीन विक्रम स्वतःसाठी नव्हे तर संघासाठी महत्त्वाचे असल्याचे आवर्जून नमूद करते. भारतात महिला क्रिकेटला प्रतिष्ठा आणि लोकमान्यता मिळावी म्हणून विश्वकरंडक जिंकणे किती महत्त्वाचे आहे याची मितालीला कल्पना आहे. 2013 मध्ये मायदेशातील स्पर्धेत सुवर्णसंधी हुकल्याची हुरहुर मितालीला आजही जाणवते. हीच कसर भरून काढण्यासाठी मितालीने साधना सुरु ठेवली आहे. या वाटचालीत तिला -महिला क्रिकेटची कपिल देव- असे बिरूद मिळालेल्या झूलन गोस्वामीची साथ लाभत आहे.

मिताली खेळपट्टीवर कशी आली याचा थोडक्यात उल्लेख करणे समयोचित ठरेल. हैदराबादमध्ये भाऊ मिथूनबरोबर ती मैदानावर सकाळी जायची. आधी तिला झोप आवरायची नाही, पण नंतर नुसत्या निरीक्षणातून तिने तंत्र आत्मसात केले. वडील दोराई राज यांनी मग तिला प्रोत्साहन दिले. मिताली तेव्हा भरतनाट्यम सुद्धा करायची. एकवेळ भरतनाट्यम स्पर्धा आणि महिला क्रिकेट संघाचे शिबीर असे दोन पर्याय मितालीसमोर होते. यात तिने क्रिकेटला पसंती दिली. भरतनाट्यममुळे तिची साधना-आराधना सुरु होती. हेच तिने क्रिकेटच्या मैदानावर नित्यनेमाने केले आहे.

अखेर टीम इंडिया सुटली; प्रसाद यांचा कालवधी संपला

20 वर्षांच्या वन-डे कारकिर्दीत मितालीने सचिनप्रमाणेच असंख्य विक्रम केले आहेत, पण तिला एका वर्तुळाच्या पलिकडे फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. अर्थात मितालीमधील साध्वी या सर्वांच्या पलिकडे गेली आहे. यामुळेच तिने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. कोणत्या क्षणी थांबायचे हे तिने स्वतः ठरविले. त्यामुळे हरमनप्रीत कौर हिच्याशी वाद होऊनही तिने संघभावनेवर, देशप्रेमावर परिणाम होऊ दिला नाही.

​ ​

संबंधित बातम्या