'आय-लीग'च नव्हे, तर 'आयएसएल'बाबतही प्रश्‍नचिन्ह 

वृत्तसंस्था
Saturday, 2 March 2019

एकीकडे "आय-लीग' खेळणारे क्‍लब लीगच्या भवितव्याबाबत भारतीय फुटबॉल महासंघाकडे विचारणा करत आहेत, तर दुसरीकडे भारतातील महत्त्वाचे क्‍लब "आयएसएल'कडे वळण्यास उत्सुक नाहीत. यामुळे भारतामधील फुटबॉल लीगच धोक्‍यात आली आहे. 

कोलकाता : भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुटिया याने केवळ "आय-लीग'च नाही, तर "आयएसएल'च्या भवितव्याबाबतही प्रश्‍नचिन्ह असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

एकीकडे "आय-लीग' खेळणारे क्‍लब लीगच्या भवितव्याबाबत भारतीय फुटबॉल महासंघाकडे विचारणा करत आहेत, तर दुसरीकडे भारतातील महत्त्वाचे क्‍लब "आयएसएल'कडे वळण्यास उत्सुक नाहीत. यामुळे भारतामधील फुटबॉल लीगच धोक्‍यात आली आहे. 

अलीकडेच ईस्ट बंगाल आणि मोहन बागान यांच्यासह "आय-लीग'मधील आठ क्‍लब संघांनी फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्याकडे "आय-लीग'च्या भवितव्याविषयी विचारणा केली आहे. त्याचवेळी फुटबॉल महासंघासाठी मार्केटिंग करणाऱ्या फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट कंपनीचा निर्णयप्रक्रियेत वाढत चाललेल्या हस्तक्षेपाबाबत देखील त्यांनी तक्रार केली आहे. 
भुटिया म्हणाला, ""जोपर्यंत ईस्ट बंगाल, मोहन बागान यांच्यासह "आय-लीग'मधील अन्य प्रमुख क्‍लब "आयएसएल'मध्ये दिसत नाहीत, तोवर "आयएसएल'मधील चुरस वाढणार नाही. "आय-लीग'मधील संघांचा एक इतिहास आहे आणि त्यांनी देशातील फुटबॉलची अजोड परंपरा त्यांनी जपली आहे. त्यामुळे अशा अव्वल संघांचा "आयएसएल' मध्ये समावेश होण्याची गरज आहे.'' 
"आय-लीग' आणि "आयएसएल'मधील काही संघांना आर्थिक अडचण येत असल्याबद्दल बोलताना भुटिया म्हणाला, ""दोन्ही लीगमधील संघांना त्यांच्या लीग नियमानुसार फ्रॅंचाईजींना भारी रक्कम द्यावी लागत आहे. त्याचा परिणाम होत असावा.'' 
----------- 
ईस्ट बंगाल चांगला संघ आहे. पण, त्यांनी या वेळी आपल्या प्रशिक्षकांच्या टीमध्ये बदल केला. त्यांनी प्रशिक्षकाची नव्याने नियुक्ती आहे. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. पण, त्यांनी प्रशिक्षक आणि खेळाडूंवर विश्‍वास दाखविण्याची गरज आहे. 
-बायचुंग भुटिया 
 


​ ​

संबंधित बातम्या