आशिया करंडकापूर्वी भारतासाठी खूशखबर

वृत्तसंस्था
Tuesday, 28 August 2018

पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला खूशखबर मिळाली आहे. भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीतून सावरला असून, तो भारतीय अ संघातून खेळणार आहे. 

मुंबई : पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला खूशखबर मिळाली आहे. भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीतून सावरला असून, तो भारतीय अ संघातून खेळणार आहे. 

पाठीला झालेल्या दुखापतीमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला मुकलेला भुवनेश्वर कुमार तंदुरुस्त झाल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले असून त्याचा भारतीय अ संघात समावेश करण्यात आला आहे. पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या आशिया करंडकासाठी भुवनेश्वरचे पुनरागमन ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. 

इंग्लंड दौऱ्यात तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वरच्या पाठील दुखापत झाल्याने त्याला राष्ट्रीय क्रीडा अकादमीत उपचारांसाठी पाठविण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 29 ऑगस्टला तिसऱ्या स्थानासाठी होणाऱ्या सामन्यातून भुवनेश्वर पुनरागमन करणार आहे. दुखापतीमुळे त्याला निधास करंडक आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटीलाही मुकावे लागले होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामन्याला 30 ऑगस्टपासून सुरवात होणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या