आशियायी स्तरावर स्पर्धा करण्यासाठी फुटबॉलच्या स्थानिक विकासावर लक्ष देण्याची गरज - भूटिया  

टीम ई-सकाळ
Saturday, 1 August 2020

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भूटियाने आशियाच्या पटलावर भारताला एक मजबूत संघ म्हणून सामोरे जाण्यासाठी फुटबॉल खेळाच्या स्थानिक विकासासाठी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भूटियाने आशियाच्या पटलावर भारताला एक मजबूत संघ म्हणून सामोरे जाण्यासाठी फुटबॉल खेळाच्या स्थानिक विकासासाठी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. फुटबॉलच्या स्थानिक बळकटीकरणाच्या दीर्घकालीन अशा उद्दीष्टावर लक्ष केंद्रित केल्यास भारतीय फुटबॉलला आशियाई पातळीवर आणि त्याहूनही पुढे जागतिक पातळीवर फायदे मिळू शकतील, असे मत  बायचुंग भूटियाने व्यक्त केले आहे. 

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार असलेल्या बायचुंग भूटियाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाशी (एआयएफएफ) सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या संवादादरम्यान, भारताला चांगले दर्जेदार खेळाडू निर्माण करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. शिवाय याचा अर्थ सध्याच्या घडीला संघात चांगले खेळाडू नाहीत असे न म्हणता, पुढील काळात आशिया आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आणखी चांगले खेळाडू निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे  बायचुंग भूटियाने या संवादात नमूद केले. व याच उद्दिष्टासाठी फुटबॉल सारख्या खेळाच्या तळागाळातील विकासावर अधिक जोर देणे गरजेचे असल्याचे भूटियाने म्हटले आहे. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

तसेच, 17 वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपच्या आयोजनाचा निर्णय हा महत्वाचा असल्याचे म्हणत,  बायचुंग भूटियाने यामुळे देशातील खेळाडूंना स्पर्धांमध्ये भाग घेण्यासोबतच, प्रशिक्षणाची चांगली सुविधा आणि प्रशिक्षक उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे. व यांसारख्याच गोष्टी पुढील दीर्घकाळासाठी महत्वाच्या ठरणार असल्याचे भूटियाने म्हटले. याशिवाय अंडर-17 आणि अंडर-15 आशिया चषक स्पर्धेसाठी संघाला नियमितपणे पात्र ठरण्यासाठी फुटबॉलच्या स्थानिक विकासावर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे  बायचुंग भूटियाने सांगितले. याव्यतिरिक्त भारतीय फुटबॉलमधील सकारात्मक बदलांमध्ये इंडियन सुपर लीगनेही (आयएसएल) महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे भूटियाने अधोरेखित केले. आयएसएल सारख्या स्पर्धांमुळे पायाभूत सुविधा प्रशिक्षण क्षेत्रात, मैदानावर आल्यामुळे गुणवत्ताही आता बर्‍यापैकी उच्च दर्जाची बनली असल्याचे भूटियाने म्हटले आहे. 

यू.एस ओपन मधून जागतिक टेनिसपटू एश्लीग बार्टीची माघार  

2011 मध्ये  बायचुंग भूटियाने फुटबॉल मधून निवृत्ती घेतली होती. बायचुंग भूटियाने परदेशातील इंग्लिश क्लब मधील बरीकडून 37 आणि मलेशियन फुटबॉल क्लबमधील पेरेक एफएसाठी आठ लढती खेळल्या आहेत. यापूर्वी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने बायचुंग भूटियाला सल्लागारपदी नेमले होते.              


​ ​

संबंधित बातम्या