क्रिकेट निवड समितीच्या सदस्याला कोरोनाची लागण, संपर्कातील सर्वांची टेस्ट होणार

टीम ई-सकाळ
Saturday, 30 May 2020

ओस पडलेल्या मैदानावर पुन्हा  थरारक सामने भरवण्याच्या दिशेने पावले उचलली जात असताना क्रिकेट संघाच्या निवड समिती सदस्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

कोलकाता : कोरोनाच्या साथीमुळे गेले दोन ते तीन महिने क्रिकेट जगताला आपले सर्व सामने स्थगित करण्याची वेळ आली. देशातील रणजी क्रिकेट सामान्यांपासून ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) सर्वात श्रीमंत अशी समजली जाणारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) देखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याची नामुष्की ओढावली.  मात्र होणारे नुकसान भरून काढण्यासाठी आता पुन्हा कोरोनाची खबरदारी घेत क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ओस पडलेल्या मैदानावर पुन्हा  थरारक सामने भरवण्याच्या दिशेने पावले उचलली जात असताना क्रिकेट संघाच्या निवड समिती सदस्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

या खास सामन्याद्वारे अँडी मरे करणार टेनिस कोर्टवर पुनरागमन  

कोरोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. क्रीडा क्षेत्रातील अर्ध्याहून जास्त खेळांचे वेळापत्रक हे कोलमडले असून त्यामुळे झालेले आर्थिक नुकसान देखील मोठे आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी  खबरदारी घेत पुन्हा क्रीडा स्पर्धांचे आयोजनाची तयारी सुरु झाली आहे.  बंगाल क्रिकेट असोसिएशनमधील सदस्यालाच कोरोनाची लागण झाल्याचे समजते. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुरवातीला या सदस्याच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. यातून त्यांचा उपचार झाल्यानंतर आता या सदस्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव आता भारतीय क्रिकेटमध्ये देखील झाल्याचे समोर येत आहे.        

लॉकडाऊनमध्ये वीरेंद्र सेहवाग बनवतोय प्रवासी कामगारांसाठी जेवण   

बंगाल क्रिकेट असोसिएशन संघाच्या निवड समितीतील या सदस्याचे उपचार खासगी रुग्णालयात सुरु असून या सदस्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. निवड समितीच्या सदस्याच्या संपर्कात नेमके किती जण आले आहेत यासंदर्भातील कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. 


​ ​

संबंधित बातम्या