अशोक दिंडा झेल घ्यायला गेला अन चेंडू डोक्‍यावर आदळला (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
Monday, 11 February 2019

डावखुरा फलंदाज वीरेंद्र विवेकसिंग फलंदाजी करत होता आणि दिंडा गोलंदाजी करत होता. वीरेंद्रने सरळ फटकावलेला चेंडू दिंडाच्या दिशेने गेला. त्याने झेल घेण्याचा प्रयत्न करताना चेंडू वेगाने दिंडाच्या कपाळावर आदळला. त्यानंतर तातडीने वैद्यकीय पथकाने मैदानावर धाव घेतली.

कोलकाता : पश्‍चिम बंगालचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडा याला क्रिकेट सामन्यादरम्यान झेल घेण्याचा प्रयत्न करताना डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. कोलकत्यातील ईडन गार्डन्सवर ट्‌वेंटी-20 सराव सामन्यामध्ये हा अपघात झाला. 

डावखुरा फलंदाज वीरेंद्र विवेकसिंग फलंदाजी करत होता आणि दिंडा गोलंदाजी करत होता. वीरेंद्रने सरळ फटकावलेला चेंडू दिंडाच्या दिशेने गेला. त्याने झेल घेण्याचा प्रयत्न करताना चेंडू वेगाने दिंडाच्या कपाळावर आदळला. त्यानंतर तातडीने वैद्यकीय पथकाने मैदानावर धाव घेतली. 

काही वेळानंतर दिंडा या धक्‍क्‍यातून सावरला आणि त्याने ते षटकही पूर्ण केले. पण त्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्‍टरांनी त्याला दोन दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 

येत्या 21 फेब्रुवारीपासून मुश्‍ताक अली ट्‌वेंटी-20 स्पर्धा सुरू होत आहे. बंगालची पहिली लढत कटकमध्ये मिझोरामशी होणार आहे. 

संबंधित बातम्या