सुपरओव्हरचे टेन्शन दूर करण्यासाठी बेन स्टोक्सने उचलले होते 'हे' पाऊल

प्रीतम पुरोहित
Tuesday, 14 July 2020

2019 विश्वचषक सामन्यादरम्यान इंग्लड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना झाला, त्यात निर्धारित वेळेतला सामना बरोबरीत सुटल्यानंतर, सुपओव्हरही बरोबरीत सुटल्यामुळे इंग्लंडला सर्वाधिक चौकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.

लंडन : एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडकातील अंतिम सामना सुपरओव्हरमध्ये गेल्याने चांगलेच दडपण होते, त्यामुळे मोक्याच्या प्रसंगी स्वतःला शांत करण्यासाठी सुपरओव्हर ब्रेकमध्ये धुम्रपान केल्याचा गौप्यस्फोट बेन स्टोक्सने  'दि इन साईड स्टोरी ऑफ इंग्लंड' या पुस्तकात केला आहे.

विराट कोहली असलेल्या वर्ल्ड टी -20 संघाचे नेतृत्व हिटमॅन रोहितकडे     

2019 विश्वचषक सामन्यादरम्यान इंग्लड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना झाला, त्यात निर्धारित वेळेतला सामना बरोबरीत सुटल्यानंतर, सुपओव्हरही बरोबरीत सुटल्यामुळे इंग्लंडला सर्वाधिक चौकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले. बेन स्टोक्सने या सामन्यात बहारदार खेळी करताना इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा होता, त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले होते. याआधी निक हौल्ट आणि स्टिव्ह जेम्स लिखित या पुस्तकात 'संघाच्या ड्रेसिंग रुममागे जाऊन, वॉशरुममध्ये जात धुम्रपान केले आणि स्वतःला शांत केलं,' असे  लेखकांनी या प्रसंगाबद्दल लिहीलं आहे.
(सकाळ `या` कृतीचे समर्थन करत नाही)
 


​ ​

संबंधित बातम्या