‘या’ कारणासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास वेस्ट विंडीजच्या तीन खेळाडूंचा नकार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

आठ जुलै रोजी सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या कोसोटी मालिका सुरु होणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात बंद पडलेल्या क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. वेस्ट इंडीज क्रिकेट संघ इंग्लडच्या दौऱ्यासाठी 14 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मात्र निवड झालेल्या खेळाडूंपैकी डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमेयर आणि किमो पॉल यांनी पुढच्या महिन्यात होणारा इंग्लड दौरा करण्यास नकार दिल्याची माहिती क्रिकेट वेस्ट इंडीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ग्रेवी यांनी दिली आहे. 

"लॉकडाऊनमध्ये विराटने घरबसल्या कमावले कोट्यावधी रुपये!"

इंग्लड दौऱ्यासाठी निवड झालेले डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमेयर आणि किमो पॉल हे तीन्ही खेळाडूंनी क्रिकेटच्या तीन्ही प्रकारांसाठी क्रिकेट वेस्ट इंडीज बोर्डासोबतचा वार्षीक करार केलेला आहे. ग्रेव यांनी सांगीतले की, “खेळाडूंनी इंग्लड दौरा करण्यासाठी खेळाडू का नकार देत आहेत त्याचे कारण समजू शकतो आणि त्या खेळाडूंबद्द मला सहानभूती देखील आहे.” ग्रेव यांनी सांगीतले की, “ किम पॉल हा त्याच्या परिवारातील एकमेव कमवता व्यक्ती आहे आणि तो खरंच खूपच जास्त काळजीत आहे, त्याला काही झाले तर त्याच्या परिवाराचे हाल होतील.”

"अखेर जातीवाचक टिप्पणी केल्याबद्दल युवराजने माफी मागीतली"

किमो पॉलने ईमेलच्या द्वारे क्रिकेट दौऱ्यातुन नाव मागे घेण्यामागील कारणे सांगीतली आहेत. “त्याच्यासाठी हा निर्णय घेणे किती कठीण आहे ते पॉलने सांगीतले आहे, त्याला वेस्टइंडीजसाठी खेळण्याची इच्छा आहे पण परिवाराच्या काळजीपोटी तो इंग्लडच्या दौऱ्यावर जाऊ इच्छीत नाही.” अशी माहिती ग्रेवी यांनी दिली. 

ब्रिटनमध्ये आजवर 2.70 लाख कोरोना व्हायरस रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे ही सद्यस्थीती पाहाता ब्रावो देखील परिवारास सोडून क्रिकेट खेळण्यासाठी जाऊ इच्छीत नाही असे त्याने कळवले असून, त्याच्यासाठी वेस्टइंडीज संघासाठी खेळणे सन्मानाची बाब आहे पण कुटूंबीयाच्या काळजीमुळे तो दौऱ्यावर जाणार नाही अशी माहिती ग्रेवी यांनी दिली. आठ जुलै रोजी सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या कोसोटी मालिकेसाठी 25 सदस्य असलेली टिम पुढच्या मंगळवारी इंग्लडला पोहचणार आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या