...म्हणून विराट, रोहित अन् धोनीला अभूतपूर्व यश मिळालं : हार्दिक पांड्या

टीम ई-सकाळ
Saturday, 27 June 2020

विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी हे खेळाडू मैदानात असतील तर, याचा प्रतिस्पर्धी संघावर चांगलाच दबाव असतो. पण हे खेळाडू इतके यशस्वी कशामुळे झाले, याचे उत्तर आता भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू हार्दिक पंड्याने दिले आहे.

सध्याच्या घडीला भारतीय संघाचा चांगलाच दबदबा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आहे. भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही वर्षांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण या खेळाडूंची जागा, ताज्या दमाच्या विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी या युवा खेळाडूंनी घेतली आहे. हे नवखेलाडू देखील पूर्वीच्या संघाप्रमाणेच सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. त्यामुळेच भारतीय संघ  क्रिकेटच्या तीनही प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्या तीन स्थानांमध्ये विराजमान आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी हे खेळाडू मैदानात असतील तर, याचा प्रतिस्पर्धी संघावर चांगलाच दबाव असतो. पण हे खेळाडू इतके यशस्वी कशामुळे झाले, याचे उत्तर आता भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू हार्दिक पंड्याने दिले आहे.

सेरी ए फुटबॉल चैंपियनशिप : जुवेंटस संघाची लिसवर मात                           

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने गुरुवारी बडोदा क्रिकेट असोसिएशन मधील अंडर १९ खेळाडूंसोबत संवाद साधला. या संवादादरम्यान हार्दिक पंड्याने नुकतेच संघाचा कर्णधार विराट कोहलीशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत, युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले. दोन दिवसांपूर्वीच विराट कोहलीशी बोलताना, तुझ्या यशाचे कारण कोणते असल्याचा प्रश्न हार्दिक पंड्याने विराटला विचारल्याचे त्याने येथे सांगितले. तसेच विराट कोहलीने हार्दिक पंड्याच्या या प्रश्नावर उत्तर देताना, तुझा खेळण्याचा दृष्टिकोन व्यवस्थित आहे. त्यामुळे खेळात नाविन्यपूर्ण सातत्य ठेवण्यासाठी फक्त एक गोष्ट सतत ध्यानात ठेव आणि ती गोष्ट म्हणजे, खेळामध्ये पहिल्या क्रमांकासाठी कायम टिकून राहणारी ओढ़, भूक महत्वाची असल्याचे विराटने सांगून, त्याकरिता कोणालाही खाली ढकलून न येता  आपल्या स्वत: च्या मेहनतीने आणि स्वतःच्या गुणवत्तेनुसार पहिला क्रमांक हेच आपले लक्ष्य असले पाहिजे असा उत्तम सल्ला, विराट कोहलीने आपल्याला दिल्याचा हार्दिक पंड्याने यावेळेस सांगितले.  

आयपीएल वरून बीसीसीआय-पीसीबी आमने सामने     

तसेच विराटच्या या उत्तरामुळेच त्याच्या खेळात इतका सातत्य असल्याचे कारण आपणाला समजल्याचे हार्दिक पंड्याने सांगितले. आणि या सर्व कारणामुळेच महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासारखे खेळाडू आपल्या कामगिरीत सातत्यपूर्ण खेळ करत असल्याचे हार्दिक पंड्याने युवा खेळाडूंना सांगताना धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या खेळाडूंना कामगिरीत दुसऱ्या नंबरवर आल्याचे आवडत नाही आणि जरी हे खेळाडू द्वितीय क्रमांकावर आलेच तर, त्यांना त्याबद्दल कोणतीही हरकत नसल्याचे हार्दिक पंड्याने सांगितले. मात्र हे खेळाडू पुन्हा पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी कठोर परिश्रमांची प्रक्रिया पुन्हा सुरू करतील. त्यामुळे सर्वोत्कृष्ट होण्याचा प्रयत्न करा आणि आयुष्यात आपल्याला स्वतः शी स्पर्धा करण्याची गरज असल्याचा मोलाचा सल्ला हार्दिक पंड्याने युवा खेळाडूंना दिला.     

 

 


​ ​

संबंधित बातम्या