... म्हणून गावसकर आयसीसीवर भडकले

शैलेश नागवेकर
Sunday, 26 July 2020

आयसीसी अध्यक्षपदावरून शशांक मनोहर पायउतार होऊन आता एक महिना पूर्ण होईल. पण आयसीसीने अजूनही नव्या कार्याध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू केलेली नाही. त्यामुळे भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी आयसीसीवर सकडून टीका केली आहे.

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदावरून शशांक मनोहर पायउतार होऊन आता एक महिना पूर्ण होईल. पण आयसीसीने अजूनही नव्या कार्याध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू केलेली नाही. त्यामुळे भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी आयसीसीवर सकडून टीका केली आहे.

आता 'या' देशांचे खेळाडूही आयपीएलच्या सुरुवातीस मुकणार? 

आयसीसीचे नक्की काय चालले आहे हे क्रिकेट विश्वाला समजायला हवे, पुढचा कार्याध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करणारी बैठक कधी होणार? आयसीसीची गोंधळलेल्या अवस्थेत आहे. हंगामी कार्याध्यक्षावर किती दिवस कारभार उरकणार ? असे अनेक सवाल उपस्थित करून गावसकर यांनी आयसीसीला चपराक मारली आहे.

भारतावर कडी करण्याासठी छुपा एजंडा
ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा पुढे ढकलण्यास विलंब करून आयपीएलला शह देण्याचा छुपा अजेंडा आयसीसीने राबवला होता, असा जोरदार हल्लाही गावसकर यांनी केला आहे.


​ ​

संबंधित बातम्या