रैनाच्या निवृत्तीच्या टायमिंगबाबत बीसीसीआय होती अनभिज्ञ 

शैलेश नागवेकर
Monday, 17 August 2020

भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीबरोबर राम लक्ष्मणाप्रमाणे नाते असलेल्या सुरेश रैनाने धोनीच्या निवृत्ती घोषणेनंतर लगेचच आपल्या निवृत्तीचीही घोषणा केली.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीबरोबर राम लक्ष्मणाप्रमाणे नाते असलेल्या सुरेश रैनाने धोनीच्या निवृत्ती घोषणेनंतर लगेचच आपल्या निवृत्तीचीही घोषणा केली. परंतु प्रोटोकॉलप्रमाणे तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवायला विसरला. अखेर त्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 तारखेला अधिकृतपणे बीसीसीआयला कळवले. 

धोनीच्या जिवलग मित्रांबद्दल तुम्हाला माहिती आहे का ? वाचा सविस्तर 

धोनीने 7.29 या विशिष्ट वेळेचा उल्लेख करत 15 ऑगस्टला सोशल मिडियावरून  निवृत्ती जाहीर केली आणि क्रिकेटविश्‍वात खळबळ उडाली. त्यावेळी धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघातील सहकारी रैनासह काही खेळाडूंबरोबर होता. धोनीच्या निवृत्तीचे वृत कळताच रैनालाही मोठा धक्का बसला त्यानेही भावनेच्या भरात आपली निवृत्ती जाहीर केली. 

शतकांनी हुलकावणी दिलेला भारताचा सलामीवीर काळाच्या पडद्याआड 

नियमाप्रमाणे एखाद्या खेळाडूने निवृत्त व्हायचे असेल तर बीसीसीआयला अधिकृतपणे त्याची माहिती देणे आवश्‍यक असते. 15 ऑगस्टची संध्याकाळ आणि त्या पुढचा काळ धोनीच्या निवृत्तीने ढवळून निघाला होता त्यात रैनाच्याही निवृत्तीची चर्चा जोरात होती. परिणामी रैना त्या दिवशी बीसीसीआयला कळवू शकला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी त्याने बीसीसीआयला आपल्या निवृत्तीबाबत कळवले आणि त्यानंतर बीसीसीआयने ईमेलद्वारे रैनाच्याही निवृत्तीची अधिकृत घोषणा केली.


​ ​

संबंधित बातम्या