म्हणा, आमच्यात सगळं छान आहे! बीसीसीआयचं खेळाडूंवर दडपण

वृत्तसंस्था
Saturday, 27 July 2019

भारतीय संघातील वातावरण एकदम चांगले आहे, अशा प्रकाराची पोस्ट सोशल मिडियावर पोस्ट करण्यासाठी प्रशासकीय समितीतील एका सदस्याने संघातील वरिष्ठ खेळाडूला विनंती केली होती, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट मंडळातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नवी माहिती पुढे आणल्यामुळे भारताच्या एकदिवसीय संघातील वरिष्ठ खेळाडूंमधली दरी दिवसें दिवस वाढताना दिसत आहे. संघातील एका खेळाडूला संघात सर्व काही अलबेल असल्याची (ऑल वेल) पोस्ट सोशल मिडियावर टाकण्याची विनंती केली जात होती. असे गौप्यस्पोट या पदाधिकाऱ्याने केला आहे. 

भारतीय संघातील वातावरण एकदम चांगले आहे, अशा प्रकाराची पोस्ट सोशल मिडियावर पोस्ट करण्यासाठी प्रशासकीय समितीतील एका सदस्याने संघातील वरिष्ठ खेळाडूला विनंती केली होती, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याचे म्हणणे असल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे. 

भारतीय संघात निर्माण झालेली दुफळी आणि त्यामुळे वाढलेला तणाव याबाबत आता सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. पण असे काही घडले नाहीत सर्व अलबेल आहे, असे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासकीय समिती पुढाकार घेत आहे आणि त्यामुळे सकारात्मक संदेश देण्यासाठी त्यांनी हालचाली सुरु केल्या मात्र त्यात प्रगती झाली नाही, असे बीसीसीआयच्या या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

प्रशासकीय समितीकडून पडद्यामागून या घडामोडी सुरु करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत खेळाडू आमच्याकडे थेट माहिती देत नाहीत तो पर्यंत आम्ही त्यात जाहीर हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे खेळाडूं सांगत नाही तोपर्यंत संघात कोणता वाद नाही, असे आम्ही समजतो, असे प्रशासकीय समितीचे म्हणणे आहे, परंतु रोहित शर्माने कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्यामुळे प्रशासकीय समितीचीही अडचण झाली आहे. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर अडचणी सुरु झाल्या होत्या. त्या पराभवाचे खापर संघाच्या बैठकीत गोलंदाजांवर फोडण्यात आले होते. परंतु केवळ गोलंदाजच त्या पराभवास कारणीभूत नव्हते तर इतरही काही कारणे होती. त्यामुळे गोलंदाजांकडे बोट दाखवण्याअगोदर कमकूवत ठरलेल्या इतर बाबींवर लक्ष द्यायला हवे होते, असाही एक मतप्रवाह पुढे आला होता. 

वाद असेल तर लवकर मिटवा 
भारतीय संघात सिनियर खेळाडूंमध्ये वाद असेल तर तो चिघळण्याच्या अगोदर लवकरात लवकर मिटवा, असे बीसीसीआयच्या इतकर पदाधिकाऱ्यांचे मत आहे. संघात दोन नेतृत्व असू नये किंवा त्यांच्या बाजूने असेलेली प्रसिद्धी माध्यम एकमेकांवर आरोप करणाऱ्या नसाव्यात. संघात मतभेद नाही असे कोणी नाकारत नाही. असे वातावरण निर्माण तयार करण्यात प्रसिद्धी माध्यम पुढे आहेत पण तसे असेल तर याच प्रसिद्धी माध्यमांना खाद्य का पुरवले जात आहे, असाही प्रश्‍न बीसीसीआयचे पदाधिकारी उपस्थित करत आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या