आता तरी विराटचे लाड थांबविणार की आज पुन्हा शास्त्रीच?

वृत्तसंस्था
Friday, 16 August 2019

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेल्या उमेदरवांच्या आज मुलाखती घेतल्या जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची कोणाकडे सोपविली जाईल हे कळेल. रवी शास्त्रीच पुन्हा भारताचे प्रशिक्षक होतील की दुसऱ्या कुणाकडे प्रशिक्षकपद दिले जाईल याचाही खुलासा होईल.  

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेल्या उमेदरवांच्या आज मुलाखती घेतल्या जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची कोणाकडे सोपविली जाईल हे कळेल. रवी शास्त्रीच पुन्हा भारताचे प्रशिक्षक होतील की दुसऱ्या कुणाकडे प्रशिक्षकपद दिले जाईल याचाही खुलासा होईल.  

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सहा जणांची नावे मुलाखतीसाठी निश्‍चित केली आहेत. त्यांच्यासह माईक हेसन, टॉम मुडी, रॉबिन सिंग, लालचंद राजपूत, फिल सिमन्स यांना तारीख व वेळ कळविण्यात आली आहे. यात टाइम झोनमुळे शास्त्रींची मुलाखत सर्वांत शेवटी होईल. 

कपिल देव, अंशुमन गायकवाड व शांता रंगास्वामी यांची क्रिकेट सल्लागार समिती मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात आज मुलाखती घेईल. हे तिघे 15 ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल झाले आहेत. काही परदेशी उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्यात येईल. शास्त्री संघासह वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्याशी स्काईपच्या माध्यमातून संवाद साधण्यात येईल, असे एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या