धोनीच्या फेअरवेल सामन्यासाठी बीसीसीआय तयार 

टीम ई-सकाळ
Wednesday, 19 August 2020

धोनीला फेअरवेल सामना मिळावा अशी इच्छा खुद्द भारतीय क्रिकेट नियामक (बीसीसीआय) मंडळाला असल्याची माहिती मिळाली आहे.

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी धोनीने आपल्या आवडत्या  गाण्यासोबत सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम वरून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. संपूर्ण क्रिकेट जगतात इतिहास घडवणाऱ्या धोनीच्या निवृत्तीने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण यापूर्वी प्रत्येकजण त्याच्या संस्मरणीय विदाईच्या सामन्याची वाट पाहत होता. तर आता इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेला सुरवात होणार आहे. त्यामुळे धोनीच्या फेअरवेल सामन्याबाबत सर्वांनाच आशंका होती. मात्र आता धोनीला फेअरवेल सामना मिळावा अशी इच्छा खुद्द भारतीय क्रिकेट नियामक (बीसीसीआय) मंडळाला असल्याची माहिती मिळाली आहे. व त्यासाठी बीसीसीआय देखील विचार करत असल्याचे समजते. 

शतकांनी हुलकावणी दिलेला भारताचा सलामीवीर काळाच्या पडद्याआड       

महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेटसाठी अमूल्य योगदान दिले आहे. त्यामुळे एम एस धोनी फेअरवेलच्या सामन्यासाठी नक्कीच हकदार असल्याचे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. तसेच बीसीसीआयला देखील धोनीचा फेअरवेल सामना हवा होता, परंतु धोनी हा वेगळा खेळाडू असल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले. व कोणीही विचार केला नव्हता अशा वेळेस धोनीने निवृत्तीची घोषणा केल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. याव्यतिरिक्त सध्या तरी धोनीशी फेअरवेल सामन्यासंदर्भात कोणतीही बोलणी झाली नसल्याचे या अधिकाऱ्याने अधोरेखित केले. आणि आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याच्याशी विचारणा करण्यात येणार असून, त्याचा सन्मान करणे मोठे सन्मानाचे ठरणार असल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

...जेंव्हा विराट कोहलीने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले ; वाचा सविस्तर   

महेंद्रसिंग धोनी आयसीसीच्या सर्व प्रकारांमधील विजेतेपदं मिळवून देणारा जगातील एकमेव कर्णधार आहे. भारताच्या या खेळाडूने आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दही चांगलीच गाजवली आहे. धोनीने अनेक विक्रमांची नोंद केली आहे. 2007 मध्ये टी-20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवत पहिला टी-20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपदही त्याने आपल्या हटक्या स्टाईलनेच भूषविले.        


​ ​

संबंधित बातम्या