सौरव गांगुलीसाठी आली `ही` आनंदाची बातमी

शैलेश नागवेकर
Saturday, 25 July 2020

सौरव यांचे मोठे बंधू स्नेहशिष हे मात्र कोरोना बाधित असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोलकता : माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोरोनाचा त्यांना कोणताही संसर्ग झाला नसल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे.  सौरव यांचे मोठे बंधू स्नेहशिष हे मात्र कोरोना बाधित असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्नेहशिष यांना कोरोना झाल्यामुळे सौरव यांच्या बेहेला निवासस्थानात रहात असलेले कुटूंब आणि कर्मचारी होम क्वारंटाईन आहेत.

'पॉप'च्या खेळीनंतर सचिन आठवणीत रमला!

या दरम्यान गांगुली यांनी आयसीसी आणि बीसीसीआयच्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला होतात. मात्र त्याचा दादागिरी हा टिव्हीकार्यक्रम पुढे ढकललेला आहे. सौरवला कोरोनाची कोणताही लक्षणे नव्हती तरीही त्याने सावधगिरी म्हणून चाचणी करून घेतली आण काल रात्री या चाचणीचा अहवाल आला. सौरवला कोरोनाचा संसर्ग झालेला नसल्यामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळ आणि त्याच्या पाठीराख्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

रोनाल्डोपेक्षा जास्त गोल; अन् तो मेस्सी नव्हे

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहशिष गांगुली, त्याची पत्नी आणि तिच्या आई वडिलांना कोरोना झाल्याचे निदान काही दिवसांपूर्वीच समोर आले होते.  स्नेहशिष हा स्वतः रणजी क्रिकेटमध्ये खेळला आहे. स्नेहशिष बंगाल क्रिकेट संघनेचा सचिव आहे. स्नेहशिष आणि त्याचे कुटूंब सौरव गांगुलीच्या बेहेला येथील बंगल्यात राहात नसून त्याचे निवासस्थान वेगळ्या ठिकाणी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु होताच गांगुलीने समाजकार्यात पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने स्वतःचे 50 लाख रुपये दिल्यानंतर गरजूंना दोन हजार किलोचा भातही दिला होता. अम्फान चक्रीवादळाचा फटका बसलेल्यानाही गांगुलीने मदतीचा हात दिला होता.गांगुलीच्या कुटुंबियांतील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ माजली होती. 


​ ​

संबंधित बातम्या