इंग्लंड संघ ट्‌वेंटी 20, वनडेही खेळणार 

संजय घारपुरे
Monday, 24 August 2020

देशांतर्गत क्रिकेट मोसमास कोरोनाची स्थिती सुधारल्यावर सुरुवात होईल, असेही गांगुली यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली: इंग्लंडविरुद्धची नव्या वर्षातील कसोटी मालिका ठरल्यानुसारच होईल. एवढेच नव्हे तर 2021 मधील आयपीएलपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या लढतीही होणार असल्याचे सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष गांगुली यांनी संलग्न संघटनांना लिहिलेल्या पत्रात सर्व आंतरराष्ट्रीय कार्यक्रम पूर्ण करण्याचेच लक्ष्य असल्याचे सांगितले आहे. 
देशांतर्गत क्रिकेट मोसमास कोरोनाची स्थिती सुधारल्यावर सुरुवात होईल, असेही गांगुली यांनी स्पष्ट केले आहे.

 बीसीसीआयने धोनीला योग्य वागणूक दिली नाही ; वाचा सविस्तर

"आंतरराष्ट्रीय सामन्यांबाबतच्या सर्व कराराची पूर्ती भारतीय क्रिकेट मंडळ आणि भारतीय संघ करणार आहे. आयपीएलची सांगता झाल्यावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियास रवाना होईल. तेथील मालिका डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे,'' असे गांगुली यांनी संलग्न संघटना तसेच अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

धोनीच्या निवृत्तीनंतर न्यूज चॅनलने लावला भलत्याच 'युवराज सिंग'ला फोन; VIDEO VIRAL  

इंग्लंडचा संघ कसोटी मालिकेसाठी नव्या वर्षात भारत दौऱ्यावर येणार आहे. हा संघ तीन एकदिवसीय सामने आणि तीन ट्‌वेंटी- 20 लढतीही खेळणार आहे. या लढती आयपीएलपूर्वी होतील, असे गांगुली यांनी स्पष्ट केले.
 


​ ​

संबंधित बातम्या