खेळपट्टी शोधून दाखवा; बीसीसीआयचं फोटो दाखलत चॅलेंज..

वृत्तसंस्था
Friday, 28 February 2020

क्राईस्टचर्चः भारत-न्युझीलंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना उद्या क्राइस्टचर्च येथील हेगली ओव्हल मैदानावर होणार आहे. भारताला या दोन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी हा सामना जींकणे आवश्यक आहे. या सामन्याच्या आधी बीसीसीआयच्या एका ट्वीटने लोकांची उत्सुकता वाढवली आहे. त्या ट्वीटमध्ये मैदानावरील खेळपट्टी गायब झाल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे. 

बीसीसीआयकडून मैदानाचा फोटो प्रसिध्द केला आहे. त्या फोटोला दिलेल्या कॅपशन मध्ये खेळपट्टी कुठं आहे ते ओळखायला सांगीतले गेले आहे. या मैदानावर दुसरा कसोटी सामना होणार आहे. खेळपट्टीवर गवत असल्यामुळे खेळपट्टी दिसत नाही. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज विशेष कामगीरी करु शकले नव्हते. भारताला क्लिन स्वीप टाळण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे. 

न्यूझीलंड ने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी दरम्यान न्यूझीलंडच्या गोलंदाजांविरुध्द खेळण्यास भारतीय फलंदाजांना अडचण येत होती. मयंक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे सोडले तर बाकी खेळाडू चमक दाखवू शकले नाहीत. विराट कोहलीकडून असलेल्या अपेक्षा अद्याप तो पुर्ण करु शकलेला नाही.

त्यासोबतच न्यूझीलंडचे गोलंदाज ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी आणि काइल जेम्सनच्या हे त्यांच्या संघासाठी चांगली कामगीरी करताना दिसत आहेत. बेसिन रिझर्व्हच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना धावा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. न्यूझीलंच्या वेगवान माऱ्यासमोर त्या सामन्यात विराट कोहली, पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजारा हे भारताचे फलंदाज विशेष चमक दाखवू शकले नाहीत.

दुसऱ्या कसोटीत देखील न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर खेळण्याचे आव्हान भारतीय फलंदाजांसमोर असणार आहे. हा सामना जिंकून भारताला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे. त्यातच राहाणे आणि कोहली हे दोघे चेतेश्वर पुजाराच्या संथ खेळण्यावरुन समोरासमोर उभे ठाकले आहेत. पुजारा पहिल्या कसोटी सामन्यात मोठी खेळी करु शकला नव्हता.

​ ​

संबंधित बातम्या