King Kohli : बीसीसीआयने 'तो' व्हिडिओ शेअर करून 'रन मशीन'ला दिल्या शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

विराटने 18 ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याला पहिला सामन्यात अवघ्या 12 धावा करता आल्या होत्या. त्याने 2009 मध्ये पहिले शतक झळकाविले होते. त्यानंतर त्याची सुरु झालेली रन मशीन अद्याप थांबलेली नाही. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा जिंकलेली आहे. 

नवी दिल्ली : रन मशीन, विक्रमवीर अशी ओळख असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज 31 वा वाढदिवस असून, यानिमित्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विटरवरून त्याला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

5 नोव्हेंबर 1988 मध्ये जन्म झालेल्या कोहलीचे नाव आज जगातील महान फलंदाजांमध्ये घेतले जाते. अवघ्या 31 व्या वर्षी त्याने ही जबरदस्त कामगिरी केली आहे. किंग कोहली किंवा रन मशीन अशी अनेक नावे त्याच्यापुढे जोडली जातात. त्याच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने एक जुना व्हिडिओ शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. विराटच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शतकाचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे, की विराट कोहली 31 वर्षांचा झाला आहे. रन मशीनने येथून आपल्या कारकिर्दीची सुरवात केली होती. त्याच्या कारकिर्दीतील हे पहिले शतक होते. 

विराटने 18 ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याला पहिला सामन्यात अवघ्या 12 धावा करता आल्या होत्या. त्याने 2009 मध्ये पहिले शतक झळकाविले होते. त्यानंतर त्याची सुरु झालेली रन मशीन अद्याप थांबलेली नाही. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा जिंकलेली आहे. 

​ ​

संबंधित बातम्या