ऑस्ट्रेलियात सापडला टेनिस 'फिक्सर'; बीसीसीआय काय पाऊल उचलणार?

टीम ई-सकाळ
Monday, 29 June 2020

दांधीवालने आपल्या देशात फिक्सिंग केल्याची नोंद नाही. ऑस्ट्रेलिया किंवा इजिप्त सारख्या देशात त्याने कारवाया केल्याची माहिती आहे त्यामुळे त्याचे गुन्हे भारतीय पोलिसांच्या न्याय कक्षेत येत नाही. -अजित सिंग, बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे प्रमुख

नवी दिल्ली, ता. 29ः महत्वाच्या टेनिस स्पर्धांतील फिक्सिंग रॅकेटचा सुत्रधार भारतीय वंशाचा रवींद्र दांधीवाल याला ऑस्ट्रेलिया पोलिसांनी रडावर आणले आहे त्यामुळे बीसीसीआयही सावध झाली असून त्याच्या कारवयांवर लक्ष ठेऊन आहे. दांधीवाल हा मुळचा चंदिगढचा आहे. क्रिकेटच्या फिक्सिंगमध्ये त्याने शिकरवा केला आहे का याची माहिती आम्ही घेत असल्याचे बीसीसीआयचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख अजित सिंग यांनी सांगितले. टेनिस या खेळातील फिक्संगच्या मोठ्या रॅकेटचा दांधीवाल सुत्रधार असल्याचे व्हिक्टरिया पोलिसांनी शोधून काढल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील सिडनी मॉर्निंग हेराल्डने गेल्याच आठवड्यात प्रसिद्ध केले होते. त्यामुळे बीसीसीआयही सावध झाली आहे.क्रिकेटमधील फिक्सिंगबाबत दांधीवालचे अद्याप नाव आलेले नाही त्याच्या प्रत्यक्ष सहभाग कोठे सापडलेला नाही त्यामुळे आम्ही त्याच्यावर कारवाई करू शकत नाही, असे अजित सिंग यांनी सांगितले. 

बीसीसीआयला विस्मरण झाले की काय? कधी होणार विवोची गच्छंती...

दांधीवालचा क्रिकेट संबंध

दांधीवालचा क्रिकेट फिक्सिंगमध्ये सध्या तरी कोणता थेट दूवा सापडलेला नसला तरी त्याने क्रिकेटशी जवळीक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चंडिगढमघ्ये त्याने एक खाजगी लीग घेतली होती, परंतु तिला बीसीसीआयची परवानगी नव्हती. दोन तीन वर्षांपूर्वी त्याला भारतात अशीच एक लीग घ्यायची होती, परंतु बीसीसीआयने परवानगी नाकारली होती. अशी माहिती अजित सिंग यांनी दिली. दांधीवाल प्रामुख्याने देशाबाहेर फिक्सिंगच्या कारवाया करत करत असो असे सांगताना अजित सिंग म्हणाले, दोन वर्षांपूर्वी तो अफगाण प्रीमियर लीगशी संबंधीत होता. दोन तीन वर्षांपूर्वी नेपाळ आणि बँकॉक लीगमध्येही त्याचे नाव आले होते. पण या सर्व लीग आपल्या कक्षेत येत नसल्यामुळे आपण कारवाई करू शकत नाही मात्र त्याच्यावर लक्ष ठेऊन आहोत. 

क्रिकेटच्या मैदानातील 'हे' लाजिरवाणे रेकॉर्ड तुम्हाला माहित आहेत का?

आणखी दोन भारतीय फिक्सिंगवर गुन्हा

मेलबर्नमध्ये रहात असलेल्या राजेश कुमार आणि हरसमिरत सिंग यांना गेल्या आठवड्यात मेलबर्न न्यायदंडाधिकाऱ्यासमोर उभे करण्यात आले होते. फिक्सिंगच्या माध्यमातून  त्यांनी 3  लाख 20  हजार डॉलर कमण्याचा प्रयत्न केला होता. दांधीवालने आपल्या देशात फिक्सिंग केल्याची नोंद नाही. ऑस्ट्रेलिया किंवा इजिप्त सारख्या देशात त्याने कारवाया केल्याची माहिती आहे त्यामुळे त्याचे गुन्हे भारतीय पोलिसांच्या न्याय कक्षेत येत नाहीत, अशी प्रतिक्रिया बीसीसीआय लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे प्रमुख अजित सिंग यांनी याप्रकरणात दिली आहे.  


​ ​

संबंधित बातम्या