महिला क्रिकेटबाबत सकारात्मक विचार होतोय, पण...

सुशांत जाधव
Tuesday, 4 August 2020

बीसीसीआय महिला क्रिकेटसंदर्भात सकारात्मक विचार करत नाही असे नाही. पण त्यांनी आता  विस्तृत धोरण आखायला हवे.

भारतीय महिला संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांनी महिला क्रिकेटच्या भविष्याबाबत भाष्य केले. सध्याच्या घडीला बीसीसीआय महिला क्रिकेटबाबत सकारात्मक विचार करत असले तरी पुरुष क्रिकेट प्रमाणे त्याची व्याप्ती दिसत नाही, असे त्यांना वाटते. क्रिकेटमधील निवृत्तीनंतर समालोचक म्हणून क्रिकेटशी कनेक्ट असलेल्या अंजुम चोप्रा म्हणाल्या की,  बीसीसीआय महिला क्रिकेटसंदर्भात सकारात्मक विचार करत नाही असे नाही. पण त्यांनी आता  विस्तृत धोरण आखायला हवे.

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

ज्याप्रमाणे पुरुष क्रिकेटसंदर्भात चित्र पाहायला मिळते अगदी त्याप्रमाणे महिला क्रिकेटचेही चित्र दिसायला हवे. बीसीसीआयने यावर विचार करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सप्टेंबमध्ये नियोजित भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोरोनातून सावरत असताना भारतीय महिला संघाचा दौरा रद्द केल्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर नाराजीचा सूर उमटला होता. बीसीसीआयचा हा निर्णय योग्य नव्हता, असेही अंजुम यावेळी म्हणाल्या.

सिधू, साईना लवकरच सुरू करणार सराव ; खुद्द प्रशिक्षक गोपीचंद यांनी दिली माहिती

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आगामी आयपीएल स्पर्धेतील महिला क्रिकेटच्या समावेशाबाबत भाष्य केले. युएईत होणाऱ्या आयपीएलमध्ये महिला चॅलेंजच्या समावेशाचं त्यांनी स्वागत केलं. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीसाठी हा निर्णय फायदेशीर ठरेल, असे अंजुम चोप्रा यांना वाटते.  अंजुम चोप्रा यांनी 17 वर्षे आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. तब्बल सहा विश्वचषक स्पर्धेत त्या संघाच्या सदस्य होत्या. 100 वनडे सामने खेळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटर आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या