'टाळेबंदीत' बीसीसीआयला इतक्या कोटींचा धनलाभ ; ललित मोदींविरुद्धच्या संघर्षात सरशी 

शैलेश नागवेकर
Tuesday, 14 July 2020

कोरोना महामारीमुळे टाळेबंद झालेले क्रिकेट आणि थांबलेला उत्पन्नाचा स्रोत अशा आर्थिक अडणीत सापडलेल्या भारतीय क्रिकेट मंडळाला आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींविरुद्धची न्यायालयीन लढाई जिंकली आणि 850 कोटींचा धनलाभही झाला.

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे टाळेबंद झालेले क्रिकेट आणि थांबलेला उत्पन्नाचा स्रोत अशा आर्थिक अडणीत सापडलेल्या भारतीय क्रिकेट मंडळाला आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींविरुद्धची न्यायालयीन लढाई जिंकली आणि 850 कोटींचा धनलाभही झाला. आयपीएलचे जन्मदाते असलेल्या ललित मोदींविरुद्धच बीसीसीआयने हा संघर्ष केला आणि जिंकलाही. 

ENG vs WI : ऐतिहासिक सामन्यात विंडीजचा इंग्लंडवर विजय  

परदेशातील माध्यम हक्क मोदी यांच्या वर्ल्ड स्पोर्टस्‌ ग्रुपला नाकारण्याचा भारतीय मंडळाचा निर्णय लवादाने योग्य ठरवला आहे. या लवादात निवृत्त न्यायाधीश सुजाता मनोहर, मुकुंथाकाम शर्मा आणि एस. एस. निज्जर यांचा समावेश होता. ललित मोदी यांच्यामुळे हा चुकीचा करार झाला होता. त्याचबरोबर वर्ल्ड स्पोर्टस्‌ ग्रुप मॉरिशस यांच्यासह करार करण्याचा निर्णय योग्य नव्हता, हा भारतीय मंडळाने घेतलेला निर्णय योग्य ठरवण्यात आला आहे. त्या वेळी आयपीएल प्रशासकीय समितीचे प्रमुख असलेल्या ललित मोदी यांनी वर्ल्ड स्पोर्टस्‌ ग्रुपच्या मदतीने भारतीय मंडळात 425 कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

विराट कोहली असलेल्या वर्ल्ड टी -20 संघाचे नेतृत्व हिटमॅन रोहितकडे     
 
भारतीय मंडळास आता दोघांचा संघर्ष असताना त्रयस्थ ठिकाणी (एस्क्रो अकाऊंट) ठेवण्यात आलेली रक्कम लवादाने भारतीय क्रिकेट मंडळाला देण्याचा आदेश दिला आहे. ही रक्कम 850 कोटीं एवढी आहे. लवादाने आता मंडळाच्या बाजूने निकाल दिला आहे, त्यामुळे आता ललित मोदी यांच्याविरोधात मंडळाने केलेल्या तक्रारीनुसार कारवाई सुरू होईल, अशी अपेक्षा मंडळाचे वकील पी. रघू रामन यांनी व्यक्त केली.


​ ​

संबंधित बातम्या