बीसीसीआयच्या  कर्मचाऱ्यांनी अॉफीस नेलं घरी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 March 2020

कोरोना व्हायरस च्या भीतीने शिर्डी, शिंगणापूरसारखी देवस्थाने बंद ठेवण्यात आली आहेत. चित्रपटगृहांतही शुकशुकाट आहे. बाजार, शाळा, महाविद्यालयांनाही कुलूप आहे. क्रीडा वर्तुळातही हीच स्थिती आहे. बीसीसीआयने अनेक महत्वाच्या स्पर्धा स्थगित केल्या आहेत. 

राज्य तसेच केंद्र सरकारने कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून वेगवेगळे उपाय योजले आहेत. हे संकट परतून लावण्यासाठी खासगी संस्थाही पुढाकार घेत आहेत. कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत.

अनेक कार्पोरेट कंपन्यांचे कर्मचारी घरातूनच अॉफिसचे काम करीत आहेत. त्यामुळे आपोआप रहदारी कमी होत आहे. काही ठिकाणी संचारबंदीही आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनेही आपल्या मुंबईतील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगितलं आहे.

गर्दी टाळण्याचे सरकारने आवाहन केले आहे. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा पुढे ढकलली आहे. ही स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती १५ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. या अगोदरच भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणारी एकदिवसीय मालिका रद्द केली होती.

कोरोना व्हायरस ची साथ लवकर आटोक्यात आली नाही तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ वेगळा विचार करीत आहे. बीसीसीआयचे सौरभ गांगुली यांनी सामन्यांची संख्या कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितलं होतं. कोरोनाची क्रिकेटसह इतर खेळांनाही बाधा झाली आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या