कोरोना व्हायरसवर लस सापडली की सारं काही सुरळीत होईल – सौरव गांगुली

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

सर्व क्रिकेट स्पर्धा या माहामारीमुळे स्थगीत करण्यात आल्या आहेत.

मागच्या काही दिवसांपासून जगभरात कोरोना व्हायरस माहामारीने थैमान घातले असून जगातील सर्व व्यवहारां सोबतच क्रीडा विश्वाला देखील याचा मोठा फटका बसला आहे. सर्व नियोजीत क्रिकेट स्पर्धा या माहामारीमुळे स्थगीत करण्यात आल्या आहेत त्यांनी पुन्हा सुरु करण्यासाठी बीसीसीआय आणि आयसीसी प्रयत्न करत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)चे अध्यक्ष सौरव गांगुलीने कोरोना व्हायरसचा इलाज करण्यासाठी लस सापडल्यानंतर जनजीवन पुन्हा सामन्य होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

“या माहामारीने सगळ्या जगाला वेठीस धरले आहे, पण मला वाटते की सध्या आपल्याकडे या आजारासाठी लस सध्या उपलब्ध नाही पण 6-7 महिन्यामध्ये जेव्हा लस तयार होईल तेव्हा परिस्थीती सामान्य होईल.” असे मत सौरव गांगुलीने अनअकॅडमी या एप वर झालेल्या संवादारम्यान व्यक्त केले.

कोरोना व्हायरसमुळे इंडीयन प्रीमिअर लीग अनिश्चीत काळासाठी स्थगीत करण्यात आली आहे, तसेच ऑस्ट्रेलियात या वर्षी नियोजीत टी-20 विश्वचषक देखील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आयसीसी विश्वचषक आयोजनाबद्दलचा निर्णय जून मध्ये घेणार आहे. “मला वाटतं की क्रिकेट पुन्हा सामान्य पध्दतीने खेळणे सुरु होईल, नियोजनात काही बदल केले जातील पण बीसीसीआय आणि आयसीसी क्रिकेट पुर्वपदावर आणण्यासाठी आवश्यक ते सर्व पर्याय वापरेल.” असे गांगुलीने सांगीतले.

आयसीसी कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व सामने खेळणे, तसेच क्रिकेट सामने रिकाम्या स्टेडीयममध्ये प्रेक्षकांवीना खेळवण्याचा विचारात आहे.
गांगुलीने सांगीतले की एकदा कोरोना व्हायरसवरती लस सापडली की इतर साथीच्या आजारांप्रमाणे ही माहामारी देखील आटोक्यात येईल. क्रिकेट नक्कीच परत सुरु करण्यात येईल, खेळाडूंसाठी काही गोष्टी अडचणीच्या वाटू शकतात, त्यांना तपासणी करावी लागेल, पण या सघळ्या गोष्टी लस सापडल्यानंतर सामन्य होतील.


​ ​

संबंधित बातम्या