'विवो'नेच आयपीएलची स्पॉन्सरशिप रद्द केल्याने बीसीसीआयला फायदा  

संजय घारपुरे
Tuesday, 4 August 2020

विवो या चीनमधील कंपनीस आयपीएलचे पुरस्कर्ते कायम ठेवल्यामुळे सर्वच माध्यमातून टीका सुरु झाली होती. त्यानंतर आज मंगळवारी विवो कंपनीने स्पॉन्सरशिपसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत, बीसीसीआयसोबतच्या आयपीएल मधील करारातून माघार घेतली आहे.

नवी दिल्ली : विवो या चीनमधील कंपनीस आयपीएलचे पुरस्कर्ते कायम ठेवल्यामुळे सर्वच माध्यमातून टीका सुरु झाली होती. त्यानंतर आज मंगळवारी विवो कंपनीने स्पॉन्सरशिपसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत, बीसीसीआयसोबतच्या आयपीएल मधील करारातून माघार घेतली आहे. त्यामुळे बीसीसीआयला आगामी आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी नवा स्पॉन्सर शोधावा लागणार आहे. मात्र विवोनेच या करारातून माघार घेतल्यामुळे बीसीसीआयला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार नाही.    

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...      

काही दिवसांपूर्वी विवोने आयपीएलचे पुरस्कर्ते म्हणून माघार घेण्याचे संकेत दिले होते, पण याबाबत काहीच घडले नाही. विवो आणि आयपीएल यांच्यातील करारानुसार ज्याच्याकडून करार रद्द होईल, त्यास मोठा आर्थिक फटका बसणार असल्यामुळे दोघांनीही थेट प्रस्ताव मांडला नव्हता. 

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

दरम्यान, चीनच्या कंपन्यांच्या विरोधात देशात वातावरण आहे. विवो आयपीएलचे पुरस्कर्ते राहिल्यास त्यामुळे नकारात्मक परिणाम होतील. त्याचबरोबर कोरोना आक्रमणामुळे प्रलंबित झालेल्या आयपीएलच्या तारखांबाबत अंतिम निर्णय होत नसल्यानेही विवो नाराज होते. त्या मुद्द्यावरुन करार रद्द करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र त्यावेळी भारतीय मंडळाने त्यांचे मन वळवले होते.

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

त्याचबरोबर विवोबरोबरील करार बीसीसीआयने रद्द केला असता तर भारतीय मंडळास मोठा फटका बसण्याची शक्यता होती. हेच विवोबाबतही आहे. भारतीय क्रिकेट मंडळ पुरस्कर्त्यांबरोबरील प्रत्येक कराराच्यावेळी बँक हमी घेत असते. आता विवोने पुरस्कर्ते म्हणून माघार घेतली असल्यामुळे भारतीय मडळ बँक गॅरेंटीद्वारे करारात ठरलेली रक्कम घेऊ शकणार आहे. या कारणामुळेच सध्याच्या स्थितीला बीसीसीआयने विवो कंपनीस आयपीएलचे पुरस्कर्ते म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता विवोनेच या करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.    

हमी घेतो तुम्ही या ; इंग्लंडला पाकचा प्रस्ताव 

यापूर्वी, अखिल भारतीय व्यापारी संघटनेने विवो आयपीएलचे पुरस्कर्ते असल्यामुळे या लीगला परवानगी देऊ नये अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांना केली होती. विवो हे आयपीएलचे पुरस्कर्ते असल्यामुळे भारतीय मंडळास ही लीग भारतात तसेच परदेशात घेण्यास विरोध करण्याची विनंती त्यांनी केली होती. विवोबरोबरच पेटीएम, अलीबाबा, ड्रीम इलेव्हन, स्विगी या चीनशी संबंधित कंपन्या आयपीएलच्या सहपुरस्कर्ते आहेत.


​ ​

संबंधित बातम्या