IPL सहप्रायोजकांविरुद्ध BCCIचेच चौकशीचे आदेश;   वाचा काय आहे हे प्रकरण

टीम ई-सकाळ
Saturday, 11 July 2020

मोहालीजवळ झालेल्या लीगशी ड्रीम इलेव्हनचा संपर्क असू शकतो. या लीगमध्ये वापरण्यात आलेले किटस्‌ यापूर्वीच्या ड्रीम इलेव्हनने घतेलेल्या स्पर्धेत वापरलेले असावेत. प्रत्येक किटच्या मागील बाजूस ड्रीम इलेव्हन होते. आता हे कदाचित फसवे असू शकते; पण दोन संघांनी ड्रीम इलेव्हनच्या चिन्हावर टेप लावल्या होत्या, हे धक्कादायक आहे.

मोहाली: प्रत्यक्षात मोहालीजवळील गावात झालेल्या, पण प्रक्षेपणात श्रीलंकेत झालेल्या लीगशी ड्रीम इलेव्हन संबंधित असल्याची माहिती भारतीय क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीने मोहाली पोलिसांना दिली आहे. ड्रीम इलेव्हन हे आयपीएलचे सहपुरस्कर्ते असल्याने मंडळाच्या समितीने केलेल्या शिफारशीलाजास्त महत्त्व आहे. उवा ट्‌वेंटी 20 लीग ही श्रीलंकेत होत असल्याचे लीग प्रक्षेपित करणाऱ्या फॅनकोडने सांगितले होते. प्रत्यक्षात ही लीग मोहालीनजीकच्या सावारा गावात झाली होती. फॅनकोड तसेच ड्रीम इलेव्हन या ड्रीम स्पोर्टस्‌ ग्रुपमधील कंपनी आहेत. मोहालीजवळच्या गावात होत असलेल्या या लीगसाठी फॅनकोड कसे तयार झाले, हा प्रश्न आहे, अशी शंका मंडळाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीने उपस्थित केली आहे. 

अग...अग... म्हशी...अशी का झाली पाक मंडळाची अवस्था ?

मोहालीजवळ झालेल्या लीगशी ड्रीम इलेव्हनचा संपर्क असू शकतो. या लीगमध्ये वापरण्यात आलेले किटस्‌ यापूर्वीच्या ड्रीम इलेव्हनने घतेलेल्या स्पर्धेत वापरलेले असावेत. प्रत्येक किटच्या मागील बाजूस ड्रीम इलेव्हन होते. आता हे कदाचित फसवे असू शकते; पण दोन संघांनी ड्रीम इलेव्हनच्या चिन्हावर टेप लावल्या होत्या, हे धक्कादायक आहे. आता हे चिन्ह लपवण्याचा प्रयत्न करण्याचे कारणच काय, जर ते झाकायचे होते, तर मुळात ते प्रिंट का केले, अशी विचारणा भ्रष्टाचार प्रतिबंधक आयोगाने मोहाली पोलिसांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. 

किंग खाननं गंभीरला दिलेली मुभा दादाला दिली नव्हती

लीगबाबत आमचीच फसवणूक: फॅनकोड 
आम्ही सर्व चौकशी यंत्रणेस सहकार्य करण्यास तयार आहोत. आम्ही प्रक्षेपणाचा निर्णय घेण्यापूर्वी स्पर्धा अधिकृत असल्याची खातरजमा करतो. याबाबत फसवणूक झाल्याची तक्रार आम्ही मुंबई पोलिसाकडे केली आहे. या लीगमधील श्रीलंकेतील उवा प्रांत क्रिकेट संघटनेची मान्यता आहे, असे पत्र आम्हाला देण्यात आले होते. आम्ही भारतीय क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक संस्थेस आमच्याकडील सर्व माहिती दिली आहे, असे फॅनकोडने सांगितले आहे.


​ ​

संबंधित बातम्या