गरजूंना सौरव गांगुली करणार 50 लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 March 2020

गरजू लोकांना लाल बाबा कंपनीच्या मदतीने सौरव 50 लाखांच्या तांदळाची मदत करणार आहे. 

भारतासह जगभरत कोरोना व्हायरस पसरला आहे, या भयंकर आजाऱाने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाला आवर घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, त्यासाठीच भारतात 21 दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. डॉक्टरांच्या उपचारानंतर शेकडो रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. कोरोना विरोधात लढण्यासाठी अनेक लोक आर्थिक मदत करत आहेत. बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांने देखील यात पुढाकार घेतला आहे.  

भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारा क्रिकेटपटू करतोय हे काम

भारत 21 दिवसांसाठी लॉक डाऊन पाळण्यात येत आहे, लोकांना गरजेच्या वस्तूंची कमतरता होऊ नये यासाठी सौर गांगुली समोर आला आहे. त्याने पंन्नास लाख रुपये किमतीची तांदूळ गरजूना दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच त्याने इडन गार्डन स्टेडीयम मदतीसाठी खुले करण्याचा प्रस्ताव देखील ठेवला आहे. सुरक्षेच्या करणास्तव सरकारी शाळांमध्ये जे नागरिक ठेवण्यात आले आहेत, अशा गरजू लोकांना लाल बाबा कंपनीच्या मदतीने सौरव 50 लाखांच्या तांदळाची मदत करणार आहे. 

कोरोनापासून बचावासाठी विराट-अनुष्काचा खास संदेश 

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांना गराच्या बाहेर पडू नये, परदेशातून आलेल्या लोकांनी योग्य त्या चाचण्या करुन घ्याव्यात व स्वत:ला कोरंटाइन करुन घ्यावे अशा सूचना देण्यात येत आहेत. सरकारने आम्हाला विचारणा केल्यास ईडन गार्डनवरील सुविधा पुरवण्यास आम्ही तयार आहोत. त्या घडीला शक्य असेल ते आम्ही करु, आमची काहीही हरकत नाही असे सौरव गांगुली म्हणाला. 
 


​ ​

संबंधित बातम्या