जर्मनीत बायर्न विजेतेपदाच्या शर्यतीत 

वृत्तसंस्था
Sunday, 10 February 2019

पीएसजी भक्कम; पण... 
पीएसजीने लीग वनमध्ये बॉरडॉक्‍सला 1-0 असे हरवले खरे; पण त्यांचा अव्वल खेळाडू एडिसन कॅवानी जखमी झाला. तो आता यामुळे मॅंचेस्टर युनायटडेविरुद्धच्या चॅंपियन्स लीग लढतीस मुकण्याची शक्‍यता आहे. कॅवानीने या मोसमात पीएसजीकडून सर्वाधिक 22 गोल केले आहेत. 

म्युनिक (जर्मनी) : व्यावसायिक फुटबॉलमध्ये जर्मनीतील लीगमध्ये बायर्न म्युनिक संघाने शेल्के संघावर विजय मिळवून आपण अजूनही विजेतेपदाच्या शर्यतीत आहोत हे दाखवून दिले. यामुळे आता जर्मन लीगमधील विजेतेपदाची चुरस वाढली आहे. 

गतविजेत्या बायर्न म्युनिकने जर्मनीतील लीगमध्ये पुन्हा विजेतेपदाच्या शक्‍यतेत येताना शेल्केचा 3-1 पाडाव केला. त्याच वेळी अव्वल असलेल्या बोरुसिया डॉर्टमंडला हॉफेनहेमविरुद्ध 3-3 बरोबरी स्वीकारावी लागली. यामुळे म्युनिक आणि डॉर्टमंड यांच्यात आता पाचच गुणांचा फरक आहे. लेवांडस्कीने बायर्नकडून केलेला शंभरावा गोल हे त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य. 

पीएसजी भक्कम; पण... 
पीएसजीने लीग वनमध्ये बॉरडॉक्‍सला 1-0 असे हरवले खरे; पण त्यांचा अव्वल खेळाडू एडिसन कॅवानी जखमी झाला. तो आता यामुळे मॅंचेस्टर युनायटडेविरुद्धच्या चॅंपियन्स लीग लढतीस मुकण्याची शक्‍यता आहे. कॅवानीने या मोसमात पीएसजीकडून सर्वाधिक 22 गोल केले आहेत. 

माद्रिद संघात रेयाल सरस 
रेयालने माद्रिद संघातील लढतीत ऍटलेटिकोचा 3-1 असा पाडाव केला. ला लीगामधील सलग पाचव्या विजयामुळे रेयालने आता दुसरा क्रमांक मिळवला आहे. रेयाल आणि आघाडीवरील बार्सिलोना यांच्यात पाचच गुणांचा फरक आहे. रेयाल आमच्यापेक्षा सरसच आहेत, ते त्यांनी वारंवार दाखवले आहे, असे ऍटलेटिकोचे मार्गदर्शक दिएगो सिमॉन यांनी सांगितले. दरम्यान, पुन्हा बदली खेळाडू म्हणून आलेल्या गेरार्थ बेल याने रेयालकडून शंभरावा गोल केला. 

दुधाचा हमीभाव वाढवण्यासाठी फुटबॉल संघाची कोंडी 
दुधाच्या हमीभावाचा प्रश्‍न इटलीमध्येही ऐरणीवर आला आहे. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी तेथील दूध विक्रेत्यांनी "कॅलिगरी कालिको' या संघाची सरावाच्या मैदानावरच कोंडी केली; तसेच आपल्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी क्‍लबने लढत खेळू नये, अशी मागणीही करण्यात आली. दूध विक्रेत्यांनी क्‍लबमधील स्टार खेळाडूंनी दुधाच्या जारला किक मारल्याचे छायाचित्रही सोशल मीडियावर प्रसारित केले. आता याचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कॅलिगरीवर अव्वल श्रेणीतून बाद होण्याचा धोका आहे. 

संबंधित बातम्या