बार्सिलोना, रेयाल माद्रिदचे एकाच दिवशी पराभव 

वृत्तसंस्था
Thursday, 27 September 2018

स्पॅनिश लीगमधील या दोन बलाढ्य संघांचा एकाच दिवशी पराभूत होण्याचा 2015 नंतरचा हा पहिलाच प्रसंग आहे. बार्सिलोनासाठी ही हार विचार करायला लावणारी आहे. या अगोदरच्या सामन्यात त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. तीन दिवसांत आम्ही पाच गुण गमावले आहेत, याचे विश्‍लेषण करणे कठीण आहे, अशी खंत बार्सिलोनाचे प्रशिक्षक एर्नेस्टो वेलवर्दे यांनी व्यक्त केली. 

पॅरिस : सुपरस्टार खेळाडूंमुळे सुपरपॉवर असलेल्या बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद या दोन्ही बलाढ्य संघांना ला लीगा स्पर्धेत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मेस्सीच्या बार्सिलोनाचा तर 20 व्या स्थानी असलेल्या लिजेन्सने 2-1 असा पराभव केला, तर सेव्हिलाने रेयालचा 3-0 धुव्वा उडवला. 

स्पॅनिश लीगमधील या दोन बलाढ्य संघांचा एकाच दिवशी पराभूत होण्याचा 2015 नंतरचा हा पहिलाच प्रसंग आहे. बार्सिलोनासाठी ही हार विचार करायला लावणारी आहे. या अगोदरच्या सामन्यात त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. तीन दिवसांत आम्ही पाच गुण गमावले आहेत, याचे विश्‍लेषण करणे कठीण आहे, अशी खंत बार्सिलोनाचे प्रशिक्षक एर्नेस्टो वेलवर्दे यांनी व्यक्त केली. 

लिजेन्स हा संघ यंदाच्या ला लीगामध्ये 20 व्या स्थानी आहे त्यामुळे बार्सिलोनाच्या विजयाची शक्‍यता फार मोठी होती. गेल्या तीन मोसमात बार्सिलोनाविरुद्ध त्यांना एकही गुण मिळवला आला नव्हता. बार्सिलोनाचा सुमार खेळ त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरला असला तरी 53 व्या मिनिटाला ऑस्कर रॉड्रिगेझने केलेला गोल निर्णायक ठरला. ऑस्कर हा रेयाल माद्रिदच्या युवा संघाचा माजी खेळाडू होता. बार्सिलोनाचा डिफेंडर गेराल्ड पिकेने बचावात केलेल्या चुकीचा फायदा घेत नबिल अल झहरने लिजेन्सकडून पहिला गोल केला. बार्सिलोनाचा एकमेव गोल कुटिन्होने पूर्वार्धात केला होता. 

बार्सिलोनाचा सामना झाल्यानंतर रेआल मैदानात उतरले होते. सेव्हिलावर विजय मिळवून त्यांना यंदा प्रथमच आघाडी घेण्याची संधी होती. पण उत्तरोत्तर त्यांची पीछेहाटच होत गेली. सेव्हिलाकडून खेळणाऱ्या पोर्तुलागच्या अँड्री सिल्वाने 17 आणि 21 व्या मिनिटाला गोल केले तर 39 व्या मिनिटाल विसाम बेन येडरने गोल करून रेयाल माद्रिदच्या जखमेवर मीठ चोळले. रेयालकडून लुका मॉड्रिचने पूर्वार्धात चेंडू गोलजाण्यात मारला होता, परंतु व्हिडिओ रिव्हयूमध्ये तो ऑफसाईड ठरवण्यात आला. 

​ ​

संबंधित बातम्या