फुटबॉलपटू नेमारवर पुन्हा बंदी 

वृत्तसंस्था
Friday, 10 May 2019

फ्रेंच करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संघ हरल्यानंतर त्याने एका प्रेक्षकाला शिवीगाळ केली होती. त्यामुळे त्याच्यावर तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली. याशिवाय त्याला आणखी दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले.

पॅरिस : पीएसजीकडून खेळणारा ब्राझीलचा प्रतिभाशाली, पण वादग्रस्त फुटबॉलपटू नेमार याला पुन्हा बंदीला सामोरे जावे लागले आहे.

फ्रेंच करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संघ हरल्यानंतर त्याने एका प्रेक्षकाला शिवीगाळ केली होती. त्यामुळे त्याच्यावर तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली. याशिवाय त्याला आणखी दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले. 13 मे पासून बंदी लागू होईल.

त्यामुळे तो "लीग 1'मध्ये शनिवारी अँजर्सविरुद्ध खेळू शकेल. फ्रेंच चॅंपियन्स करंडक अंतिम फेरीला मात्र त्याला मुकावे लागेल. चॅंपियन्स लीगच्या वेळीही त्याने मॅंचेस्टर युनायटेडविरुद्धच्या लढतीत पंचांना शिवीगाळ केली होती. त्याबद्दल त्याला तीन सामन्यांच्या बंदीला सामोरे जावे लागणार आहे.

संबंधित बातम्या