माफीनाम्यानंतर या खेळाडूची खेलरत्नसाठी शिफारस

टीम ई-सकाळ
Sunday, 21 June 2020

विशेष म्हणजे यापूर्वी आडमुठेपणाच्या निर्णायामुळे किदाम्बी श्रींकातच्या नावाची शिफारस खेलरत्नसाठी केली जाणार नाही, अशी भूमिका भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने घेतली होती. मात्र श्रींकातने माफी मागितल्यानंतर अखेर त्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. 

नवी दिल्ली : खेळाच्या मैदानातील लक्षवेधी कामगिरीसाठी भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या संदर्भात बॅडमिंटनमधील प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खेळ जगतातील देशातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या खेळरत्न पुरस्कारासाठी पुरुष गटात दमदार कामगिरी करणाऱ्या किदाम्बी श्रीकांतच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी आडमुठेपणाच्या निर्णायामुळे किदाम्बी श्रींकातच्या नावाची शिफारस खेलरत्नसाठी केली जाणार नाही, अशी भूमिका भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने घेतली होती. मात्र श्रींकातने माफी मागितल्यानंतर अखेर त्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. 

'ट्रेनिंगसाठी धोनी पॅड बांधताना दिसला तर ते आश्चर्यकारकच असेल'

एकेकाळी बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानावर राहिलेल्या किदाम्बी श्रीकांत आणि स्टार बॅडमिंटनपटून एचएस प्रणयने यावर्षी फेब्रुवारीमध्ये मनीलामध्ये आयोजित आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेतून माघार घेतली होती. या प्रकरणात भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने दोन्ही खेळाडूंना नोटीस धाडली होती. तसेच पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस न करण्याची भूमिका घेतली होती. त्यांच्या अनुपस्थितीत भारताच्या पदकाच्या आशा धूसर झाल्या. परिणामी इंडोनेशियाकडून भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. खेळाडूंच्या आडमूठेपणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने खेलरत्न पुरस्कारासाठी श्रीकांतचे नामांकन न करण्याचा निर्णय घेतला होता.   

जर पुरुषांची स्पर्धा स्थगित झाली तर आमची स्पर्धाही संकटात येईल : पेरी

खेळातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी बीएआयने आपल्या नावाची शिफारस न केल्यामुळे एचएस प्रणयने नाराजी व्यक्त केली होती. ज्या खेळाडूंनी राष्ट्रकूल आणि आशियाई स्पर्धेत देशाला पदक मिळवून दिले त्यांच्या नावाचा विचार पुरस्कारासाठी केलेला नाही, अशा शब्दांत प्रणयने नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रीय बॅडमिंटनचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांनी प्रणयचा हा दावा खोडून काढला आहे. 3 जून रोजी अर्जुन पुरस्कारासाठी प्रणयच्या नावाची शिफारस करण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी आयएएनएसला दिलल्या मुलाखतीवेळी दिली. बीएआयचे महासचिव अजय सिंघानिया यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. खेलरत्नसाठी श्रीकांतच्या नावाची शिफारस केली असून प्रणयला नोटिस बजावल्याची माहिती त्यांनी दिली. 15 दिवसांच्या आत प्रणयने उत्तर दिले नाही तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.   


​ ​

संबंधित बातम्या