थॉमस-उबेर स्पर्धेसाठी चाचणीविनाच संघनिवड?

संजय घारपुरे
Friday, 28 August 2020

पुरुषांसाठी होणारी थॉमस कप आणि महिलांसाठी होणारी उबेर कप स्पर्धा डेन्मार्कला 3 ऑक्‍टोबरपासून आहे. या स्पर्धेसाठी दहा पुरुष आणि दहा महिला खेळाडूंची निवड होईल. राष्ट्रीय मानांकन क्रमवारीनुसार संघनिवड करण्यावाचून सध्या तरी पर्याय नाही, असे संघटनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

मुंबई : थॉमस, तसेच उबेर बॅडमिंटन स्पर्धेच्या संघनिवडीसाठी चाचणी स्पर्धा होणार नसल्याची शक्‍यता आहे. राष्ट्रीय मानांकन क्रमवारीनुसार संघाची निवड होण्याची शक्‍यता होत आहे. खेळाडूंच्या आरोग्याबाबत कोणताही प्रश्‍न होऊ नये यासाठी हा निर्णय होत असल्याचे संकेत भारतीय बॅडमिंटन संघटनेने दिले आहेत.  

केंद्र सरकार घेणार चीनच्या सहभागाची स्पर्धा

पुरुषांसाठी होणारी थॉमस कप आणि महिलांसाठी होणारी उबेर कप स्पर्धा डेन्मार्कला 3 ऑक्‍टोबरपासून आहे. या स्पर्धेसाठी दहा पुरुष आणि दहा महिला खेळाडूंची निवड होईल. राष्ट्रीय मानांकन क्रमवारीनुसार संघनिवड करण्यावाचून सध्या तरी पर्याय नाही, असे संघटनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

अँडरसनच्या धमाकेदार कामगिरीनंतर युवराजने दिलं बुमराहला टार्गेट

या दोन्ही स्पर्धांसाठी सराव शिबिर घेण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. हे शिबिर 8 सप्टेंबरपासून घेण्याबाबत भारतीय बॅडमिंटन संघटनेने क्रीडा प्राधिकरणास सुचवले आहे. याबाबत भारतीय संघटनेचे पदाधिकारी आणि क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांत चर्चा सुरू आहे, असेही संघटनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

​ ​

संबंधित बातम्या