Thailand Open : सायना हरली; श्रीकांतनं अर्ध्यातच सोडला सामना  

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 14 January 2021

दुसरीकडे पुरुष एकेरीतही भारताला धक्का बसला. बॅडमिंटन क्रमवारीत अव्वलस्थान भुषवलेल्या किदाम्बी श्रीकांतला उजव्या पायाच्या पिंडरीच्या स्नायू दुखापतीमुळे कोर्ट सोडण्याची नामुष्की ओढावली.

बँकॉक : भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक विजेती सायना नेहवालची नव्या वर्षातील सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. पहिल्या फेरीत दिमाखदार विजय नोंदवणाऱ्या सायनाला गुरुवारी महिला एकेरीत पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे थायलंड ओपन सुपर 1000 बॅडमिंटनमधील तिचा प्रवास संपुष्टात आला आहे. सायनाने पहला सेट जिंकून आगेकूच करण्याचे संकेत दिले. पण कामगिरीत सातत्य राखण्यात तिला अपयश आले. 68 मिनिटे रंगलेल्या सामन्यात  23-21,14-21,16-21 असा पराभव तिच्या पदरी पडला. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 12 व्या स्थानावर असलेल्या  बुसानन विरुद्ध सायनाचा हा सलग चौथा पराभव ठरला. 

दुसरीकडे पुरुष एकेरीतही भारताला धक्का बसला. बॅडमिंटन क्रमवारीत अव्वलस्थान भुषवलेल्या किदाम्बी श्रीकांतला उजव्या पायाच्या पिंडरीच्या स्नायू दुखापतीमुळे कोर्ट सोडण्याची नामुष्की ओढावली. मलेशियाच्या आठव्या मानांकनावर असलेल्या  ली जी जिया याला त्याने वॉकओव्हर दिला.  यापू्र्वी  पुरुष दुहेरीत भारताच्या के सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना इंडोनेशियाच्या  मोहम्मद अहसान आणि हेंड्रा सेतियावान यांच्याकडून 19-21, 17-21 ने पराभवाचा सामना करावा लागला. 

ICC Twitter Poll: विराट-इम्रान खान यांच्यात रंगली चुरशीची लढत; जाणून घ्या कुणी मारली बाजी

सायना आणि बुसानन यांच्यात रंगतदार सामना झाला. त्यांच्यातील रॅली खूप वेळ चालली. पण थायलंड खेळाडूने घरच्या मैदानावर चांगले फटके खेळत सामना आपल्या बाजूनं वळवण्यात यश मिळवले. पहल्या सेटमध्ये  सायनाने एकवेळी 6-5 अशी आघाडी घेतली होती. ब्रेकनंतर बुसानन  11-9 अशी आघाडी घेतली. सायनाने यानंतर कमबॅक करत 17-17 अशी बरोबरी केली आणि पहिला सेटही आपल्या नावे केला. पण अखेरच्या दोन सेटमध्ये थाई खेळाडूने जोरदार टक्कर देत कमबॅक करुन स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले.


​ ​

संबंधित बातम्या