Thailand Open : सायना-श्रीकांतची विजयी सलामी 

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 13 January 2021

सायना शिवाय किदाम्बी श्रीकांतने भारताच्या सौरभ वर्माला  21-12 21-11 पराभूत करत स्पर्धेतील आपला प्रवास सुरु ठेवला. अवघ्या 31 मिनिटांत त्याने सामन जिंकला.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पुरुष एकेरीच्या जागतिक क्रमावारीत एकेकाळी अव्वलस्थानी पोहचलेला श्रीकांत यांनी थायलंड ओपन स्पर्धेत विजयी सलामी दिली. थायलंड ओपन सुपर 1000 स्पर्धेत सायना नेहवालने मलेशियाच्या सेल्वादुरासे किसोना हिला  21-15 21-15 पराभूत केले. तिचा पुढचा सामना थायलंडच्या बुसानन ओंगबामरूंगफान हिच्याशी होणार आहे. 

सायना नेहवालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिला स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली होती. मात्र तिचा रिपोर्ट पुन्हा निगेटिव्ह आला आणि तिचा कोर्टवर उतरण्याचा मार्ग मोकळा झाला. सामना जिंकल्यानंतर सायना म्हणाली की, पीसीआर चाचणीनंतर माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. याठिकाणी यापूर्वी कोरोना झाल्याची माहिती मी दिली होती. नोव्हेंबरमध्ये कोरोना झाल्यामुळे माझ्यात अँटिबॉ़डीज आहेत. त्यानंतर ब्लड टेस्ट आणि एक्सरे पुन्हा तपासून पाहिल्यावर कोविड -19 रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे सांगत मला खेळण्याची परवानगी देण्यात आली. 

ICC Twitter Poll: विराट-इम्रान खान यांच्यात रंगली चुरशीची लढत; जाणून घ्या कुणी मारली बाजी

सायना शिवाय किदाम्बी श्रीकांतने भारताच्या सौरभ वर्माला  21-12 21-11 पराभूत करत स्पर्धेतील आपला प्रवास सुरु ठेवला. अवघ्या 31 मिनिटांत त्याने सामन जिंकला. श्रीकांतचा पुढचा सामना मलेशियाच्या आठव्या मानांकित जि जिया ली याच्यासोबत होणार आहे. दुसरीकडे  राष्ट्रकूल स्पर्धेतील माजी चॅम्पियन पी कश्यपला सामना अर्ध्यातूनच सोडण्याची वेळ आली. स्नायू दुखापतीमुळे त्याने माघार घेतली. श्रीकांतचा पुढचा सामना मलेशियाच्या आठव्या मानांकित जि जिया ली याच्यासोबत होणार आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या