Thailand Badminton Open : सायनाच्या कोरोना रिपोर्टमध्ये गोंधळ; कोर्टवर उतरण्याचा मार्ग मोकळा!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 12 January 2021

थायलंडमध्ये कोरोना चाचणी घेताना निष्काळजीपणा सुरुय का? असा प्रश्न आता उपस्थितीत होत आहे.   

Thailand Badminton Open : ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॅडमिटन स्टार सायना नेहवाल सायना नेहवाल आणि एचएस प्रणव थायलंड ओपनमध्ये खेळणार असल्याची पुष्टी जागतिक बॅडमिंटन महासंघाने (BWF) केली आहे. सायना नेहवालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ती स्पर्धेला मुकणार असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र सायनाच्या रिपोर्ट पहिला रिपोर्ट चुकीचा असून तिला कोरोनाची लागण झालेली नाही हे स्पष्ट झाले आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तिचा कोर्टवर उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

BWF ने दिलेल्या माहितीनुसार, सायना नेहवाल आणि तिचा पती पी कश्यप एकेरीमध्ये मैदानात उतरणार आहेत. सायनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी नियोजित असलेल्या तिच्या प्रतिस्पर्ध्यांना वॉकओवर देण्यात आले होते. मात्र आता बुधवारी हा सामना खेळवण्यात येणार आहे. सायना नेहवालनेही ट्विटच्या माध्यमातून खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगत आनंद व्यक्त केलाय.  

Thailand Open : कोरोना टेस्टवेळी नाकातून आलं रक्त; श्रीकांत संतापला

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने (BAI) म्हटलंय की, सायना नेहवाल आणि तिचा पती पी कश्यप यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आहे. त्यांना स्पर्धेत खेळण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. आम्ही हस्तक्षेप केल्यामुळे स्पर्धेत दोन्ही खेळाडूंच्या हिताचे ठरले, असे बॅडमिंटन असोसिएशनने म्हटले आहे.

सायना नेहवालचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारतीय खेळाडूंची अतिरक्त चाचणी घेण्यात आली होती. किदाम्बी श्रीकांतची चाचणी घेताना त्याच्या नाकातून रक्त आल्याचे वृत्त समोर आले. किदाम्बीने यासंदर्भात ट्विट केले होते. यावरुन थायलंडमध्ये कोरोना चाचणी घेताना निष्काळजीपणा सुरुय का? असा प्रश्न आता उपस्थितीत होत आहे.   


​ ​

संबंधित बातम्या