पीव्ही सिंधूच्या ट्विटवर क्रीडामंत्र्यांची रिअ‍ॅक्शन  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 November 2020

भारताची स्टार बॅडमिंटनपटू ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती आणि विश्वविजेती पीव्ही सिंधूने केलेल्या ट्विटने सोशल मीडियावर चांगलेच वादळ आणले आहे.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती आणि विश्वविजेती पीव्ही सिंधूने केलेल्या ट्विटने सोशल मीडियावर चांगलेच वादळ आणले आहे. पीव्ही सिंधूने केलेल्या या ट्विटची सुरवातच 'आय रिटायर' अशा दोन अनपेक्षित शब्दांनी झाली. शिवाय या पोस्ट मध्ये तिने 'डेन्मार्क ओपन ही शेवटची स्पर्धा होती,' असे तिने म्हटले आहे. 

CSK च्या खेळाडूचा माफीनामा ; चाहत्यांनो माफ करा 

पीव्ही सिंधूने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे. आणि तिच्या या पोस्टने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. भारताचे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही सिंधूच्या 'निवृत्ती' पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. किरेन रिजिजू यांनी  पीव्ही सिंधूने केलेले ट्विट रिट्विट करत रिप्लाय दिला आहे. या रिप्लाय मध्ये त्यांनी सिंधूने प्रत्यक्षात एक छोटा धक्का दिला, मात्र मला तुमच्या दृढनिश्चय शक्तीवर विश्वास असल्याचे म्हटले आहे. शिवाय तुझ्यात भारतासाठी आणखी बरेच नामांकित बहुमान मिळवून देण्याची शक्ती आणि सामर्थ्य असल्याचे किरेन रिजिजू यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या सिंधूने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर तीन पेजेस शेअर केली आहेत. यामध्ये एका पेजवर डेन्मार्क ओपन माझी शेवटची स्पर्धा होती आणि मी निवृत्त असे म्हटले आहे. तिने सुरुवातीला निवृत्त असे म्हटले असले तरी शेवटच्या पेजवर तिने संभ्रमात टाकणारे वक्तव्य केले आहे. आपल्या पोस्ट मध्ये तिने आपण एशिया ओपनसाठी खेळणार असल्याचे लिहिले आहे. तसेच आपण एकत्र येऊन कोरोनाच्या महामारीचा सामना करणे गरजेचे असल्याचे तिने म्हटले आहे.  

    


​ ​

संबंधित बातम्या