गोपीचंद यांच्यासोबतच्या वादावर सिंधू अखेर बोलली 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने काही दिवसांपूर्वीच केलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली होती.

भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने काही दिवसांपूर्वीच केलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली होती. पी व्ही सिंधूने केलेल्या ट्विटची सुरवातच 'आय रिटायर' अशी होती. त्यामुळे तिच्या या ट्विटचा अनेकांना धक्का बसला होता. मात्र या ट्विटमागील सत्य हे दुसरेच होते. त्यानंतर आता पी व्ही सिंधूने कोर्टवर जाण्यासाठी एकदम फिट असल्याचे म्हटले आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत ती स्पर्धा खेळण्याची तयारी करत आहे.

हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी ज्ञानेंद्रो निंगोम्बाम यांची निवड 

पी व्ही सिंधूने दिलेल्या मुलाखतीत कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनचा सामना कसा करावा लागला याबाबत सांगितले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात  लॉकडाऊनमुळे रोजचा दिनक्रम थांबवणे कठीण होते. तसेच घरात काम करून स्वत: ला सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न केला आणि याची मदतही झाल्याचे सिंधूने सांगितले. याशिवाय कुटुंबासमवेत बराच वेळ घालवला आला आणि चित्रकलेसह काही नवीन गोष्टीही शिकल्याचे तिने या मुलाखतीत सांगितले आहे. 

याव्यतिरिक्त, लॉकडाऊनमुळे कोर्टमधे जाऊन सराव करणे शक्य झाले नाही. त्यामुळे लॉकडाऊननंतर पुन्हा सुरवात करताना थोडी अडचण झाल्याचे सिंधूने सांगितले. मात्र आता कोर्टवर जाण्यास एकदम सज्ज आणि स्पर्धेत देखील उतरण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. व जगभरात जे घडत होते त्यावरून टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याची शक्यता होती आणि त्यासाठी मानसिक तयारी देखील केली होती, असे सिंधूने सांगितले. 

Covid 19 : गौतम गंभीर होम क्वारंटाईन; सोशल मीडियावरुन दिली माहिती

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक पी गोपीचंद आणि सिंधू यांच्यात वाद सुरु असल्याचे वृत्त आले होते. त्याशिवाय राष्ट्रीय शिबिरात तिचा सराव होत नसल्याचे मत सिंधूच्या वडिलांनी व्यक्त केले होते. परंतु सिंधूने या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. सिंधूने, "गोपी सर माझे प्रशिक्षक आहेत. त्यांनी मला खूप मदत केली. माझा त्यांच्याशी वाद नाही. मी त्यांना इंग्लंडमधील गॅटोराडे स्पोर्ट्स सायन्स इन्स्टिट्यूट (जीएसएसआय) मध्ये प्रशिक्षणासाठी जात असल्याची माहिती दिली होती," म्हटले आहे.       


​ ​

संबंधित बातम्या