सिंधूसमोर पात्रतेचेही आव्हान

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

जागतिक बॅडमिंटन मालिकेतील अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत यंदा जागतिक विजेत्यांना थेट प्रवेश न देण्याचा निर्णय जागतिक महासंघाने घेतला आहे. 

नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटन मालिकेतील अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत यंदा जागतिक विजेत्यांना थेट प्रवेश न देण्याचा निर्णय जागतिक महासंघाने घेतला आहे. त्यामुळे जगज्जेत्या पी. व्ही. सिंधूचा या मोसमाची सांगता करणाऱ्या स्पर्धेतील प्रवेश अनिश्‍चित झाला आहे.

कोरोनाच्या आक्रमणामुळे यंदा स्पर्धेचे वेळापत्रक कोलमडले आहे. नियमितपणे डिसेंबरमध्ये होणारी जागतिक मालिकेतील अंतिम टप्प्याची स्पर्धा जानेवारीत (27 ते 31) होणार आहे.

जागतिक विजेतीस यात थेट प्रवेश नसल्यामुळे सिंधूला आता जानेवारीतील आशियाई मालिकेतील दोन स्पर्धांत चांगली कामगिरी करावी लागेल.


​ ​

संबंधित बातम्या