कोरोनातून सावरत सुरु होणाऱ्या बॅडमिंटन स्पर्धेतून सिंधूची माघार

सुशांत जाधव
Wednesday, 2 September 2020

या स्पर्धेच्या माध्यमातून बऱ्याच महिन्यांनी पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि के श्रीकांत सारख दिग्गज कोर्टवर उतरणार होते. मात्र सिंधू या स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने  डेन्मार्कमध्ये होणाऱ्या थॉमस आणि उबेर बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. वैयक्तिक कारणास्तव सिंधू या स्पर्धेत खेळणार नाही, अशी माहिती तिचे वडील पी.व्ही रामना यांनी एएनआयला दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा क्रीडा जगताला मोठा फटका बसला होता. बॅडमिंटनही याला अपवाद नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून बऱ्याच महिन्यांनी पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि के श्रीकांत सारख दिग्गज कोर्टवर उतरणार होते. मात्र सिंधू या स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जागतिक बॅडमिंटन असोसिएशनने वार्षिक वेळापत्रकात बदल केला होता. नव्या वेळापत्रकानुसार थॉमस आणि उबेर बॅडमिंटन स्पर्धा 3 ते 11 ऑक्टोंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. मार्चमध्ये इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर बॅडमिंटन कोर्टवर कोणतीही स्पर्धा झालेली नाही. जगभरासह देशात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे वेळापत्रकात मोठा बदल करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली होती. सैय्यद मोदी आंतरराष्ट्री आणि इंडिया ओपन या प्रसिद्ध स्पर्धा यंदाच्या वर्षी होणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले होते.    


​ ​

संबंधित बातम्या