ट्विटचे शीर्षक पाहून अंदाज करू नका ; सिंधूच्या आईची विनंती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 November 2020

सिंधूचे केवळ ट्विट पाहून निष्कर्ष काढू नका, अखेरपर्यंत पूर्ण वाचलेत तरच नेमका अर्थ कळेल, अशी उत्स्फूर्त टिपण्णी पी. व्ही. सिंधूची आई पी विजया यांनी केली.

मुंबई : सिंधूचे केवळ ट्विट पाहून निष्कर्ष काढू नका, अखेरपर्यंत पूर्ण वाचलेत तरच नेमका अर्थ कळेल, अशी उत्स्फूर्त टिपण्णी पी. व्ही. सिंधूची आई पी विजया यांनी केली. सिंधूचे पत्र वाचल्यावर तुम्हाला सर्व कल्पना येईल. ती डेन्मार्क स्पर्धेत खेळलेली नाही, मात्र आशियाई स्पर्धेत खेळणार आहे, याची ग्वाहीही त्यांनी दिली. 

हिटमॅन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणार का? BCCI अध्यक्षांनी केला खुलासा

केवळ सिंधूच्या ट्विटचे शीर्षक वाचून सर्व जण निष्कर्ष काढत आहेत. त्यांनी पूर्ण पत्र वाचायला हवे. सिंधू खेळापासून दूर झालेली नाही. ती इंग्लंडमध्ये आहे. ती आजही सरावासाठी गेली आहे. मी तिच्याशी नुकतेच बोलले आहे, असेही विजया यांनी ‘सकाळ’ला सांगितले. केवळ ट्विटचे शीर्षक पाहून त्याबाबत टिपण्णी करणे खूपच गैर आहे, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाच्या महामारीमुळे तिची डेन्मार्क ओपन हुकली आहे. नव्या वर्षात ती पूर्णपणे जोषात सहभागी होणार आहे. थायलंडमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी तिची पूर्वतयारी सुरू आहे , असे त्यांनी सांगितले.

फंलदाजी कोट्यात जागा नाही; सुर्याच्या निवडीसंदर्भात शास्त्रींची 'बोलंदाजी...

दरम्यान, रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या सिंधूने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर तीन पेजेस शेअर केली आहेत. यामध्ये एका पेजवर डेन्मार्क ओपन माझी शेवटची स्पर्धा होती आणि मी निवृत्त असे म्हटले आहे. तिने सुरुवातीला निवृत्त असे म्हटले असले तरी शेवटच्या पेजवर तिने संभ्रमात टाकणारे वक्तव्य केले आहे. आपल्या पोस्ट मध्ये तिने आपण एशिया ओपनसाठी खेळणार असल्याचे लिहिले आहे. तसेच आपण एकत्र येऊन कोरोनाच्या महामारीचा सामना करणे गरजेचे असल्याचे तिने म्हटले आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या